राष्ट्रसेवा दलातर्फे रावलापाणी येथून जागरयात्रेला सुरुवात आदिवासींच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी जागरयात्रा – डॉ.सुरेश खैरनार

0
बोरद । दि.1 । वार्ताहर-देशात स्वातंत्र्य लढयासाठी अनेक जण शहीद झाले आहेत. त्यात आदिवासींचाही समावेश आहे. मात्र, आदिवासींच्या इतिहासाला दाबण्यात आले आहे.
या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राष्ट्र सेवादलातर्फे जागर यात्रा 1 जूनपासून सुरू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार यांनी केले.
9 ऑगष्ट 1942 च्या चलेजाव आंदोलन क्रांतीपर्वाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने राष्ट्र सेवा दलाच्या व समविचारी पक्षाच्यातीने राज्यभर जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी रावलापाणी ता.तळोदा येथून या जागरयात्रेस प्रारंभ झाला. त्यावेळी डॉ.खैरनार बोलत होते. ते म्हणाले, देशात आदिवासी बेरोजगार, शिक्षण, शेतकरी समस्या यासह असंख्य प्रश्न आहेत. हे शासन केवळ मंदिर, वंदेमातरम अशा क्षुल्लक प्रश्नांना अतीमहत्व देत आहे.

परदेश दौरे हे विकासासाठी नसून केवळ देश विकण्यासाठी आहेत. सध्या अल्पसंख्यांक स्वतःला असुरक्षित समजत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका करत सदर जागर यात्रा ठिकठिकाणी स्वातंत्र्य लढतील सैनिकांच्या सन्मान करणार असून शेतकर्‍यांशी व सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न शासनासमोर मांडणार असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार यांनी केले.

या यात्रेला तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथील स्मारकाचे अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. मोड, मोरवड, बोरद मार्गे यात्रा तळोद्यात दाखल झाली.

सदर जागर यात्रा ही नंदुरबार धुळे, नाशिक, पालघर, कोकण व राज्यभरात जाणार असून शेवट मुंबई येथे होणार आहे. या यात्रेत गडचिरोली, कोकण, पुणे तसेच परराज्यातून देखील राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोद्यात स्मारक चौकात श्री गणेश सोशल ग्रुपच्या वतीने फटाक्याच्या अतिषबाजी करून या यात्रेचे स्वागत करण्यात आले. सामाजिक समता परिषद राष्ट्र सेवा दल, सहयोगी संस्था संघटना यांचा सर्व राष्ट्रीय पदाधिकार्‍यांचा गणेश ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी व ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय, भरत चौधरी, योगेश मराठे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी 2 वाजे दरम्यान तळोदा येथे वामनराव बापू मंगल कार्यालयात सामाजिक समता परिषद सुरुवात झाली या वेळी महत्वपूर्ण विषयांवर ठराव करण्यात आले.

तळोदा तालुक्यात स्वातंत्र सैनिक भगवान शेंडे, रामचंद्र पुंजु माळी, चौधरी बुलाखी कत्थु, भिक्कन पाटील, तुकाराम संपत सूर्यवंशी आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या वारसदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.एन. शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा शिंदे, डॉ.देविदास शेंडे, अजित टवाळे, प्रा.जे.एन.शिंदे, प्रा.ए.टी.वाघ, एस.एम.महिरे, एन.के.माळी, निमेश सूर्यवंशी, एस.एस.सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन जे.एन.शिंदे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*