Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबारात एकाचवेळी तयार झाले सात हजार गणपती

Share

नंदुरबार | पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आज नंदुरबार येथील मार्केट यार्ड येथे जवळपास जिल्हाभरातून सात हजार विद्यार्थानी सहभागी होऊन एकाच वेळी मातीचे गणपती बनवण्याचा विक्रम केला. या विद्यार्थ्यांनी ७ हजाराच्या वर गणपती तयार केले व समाजापुढे एक आदर्श ठेवला.

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा संस्कार यांच्या वतीने आज नंदुरबार येथे आगळावेगळा असा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सर्वत्र पर्यावर्णाचा र्‍हास होत असताना पर्यावरण वाचवण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रातर्फे घेण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अखिल भारतीय स्वामी समर्थ संचलित बाल संस्कार व युवा संस्कार केंद्राचे प्रमुख नितीन मोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जेष्ठ नेते हिरालालकाका चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी जि.प.सभापती अहिल्याबाई पावरा, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पत्रकार योगेंद्र दोरकर ,हिरालाल चौधरी, प्रशासन अधिकारी आर.बी.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

आज भारत २१ व्या युगात खूप चांगली प्रगती करत आहे. परंतु प्रगती करताना भारतीय संस्कृती टिकवणे तेवढेच महत्वाचे आहे. कारण संस्कृती टिकली तरच धर्म टिकत असतो. प्रगती करत असताना बालकांना प्राचीन गोष्टीची ओळख करून देणे फार महत्वाचे आहे. कारण प्राचीन गोष्टीची ओळख होत असताना पर्यावरणाची ओळखदेखील होत असते. विद्यार्थाना विद्यार्थीदशेतच पर्यावरणाची जाणीव झाली तर भविष्यात कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही. म्हणून सर्व सण साजरे करताना पर्यावरणपूर्वक साजरे करायला हवे. बाल संस्कार व युवा संस्कारच्या विद्यार्थ्यांनी या पर्यावरणपूरक गणेशमुर्त्याच्या उपक्रमात सहभागी होऊन नक्कीच एक आदर्श त्यांनी निर्माण केला. शास्त्रानुसार दीड दिवसाचा व तोदेखील मातीचा गणपती बसविला पाहिजे, जेणेकरून धार्मिक भावना टिकून राहतात, असे नितीन मोरे यांनी सांगितले. या बनवण्यात आलेल्या गणपती मुर्त्या जिल्ह्यातील सर्व केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या विक्रीतून आलेला सर्व पैसा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीला दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो सेवेकरी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!