Type to search

नंदुरबार फिचर्स

शहादा : केरळच्या धर्तीवर लोणखेडयात साकारणार पद्मनाभ मंदिर

Share

शहादा | ता.प्र.

तालुक्यातील लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळानजीक श्रीश्रीनारायणपूरम येथे केरळ राज्यात असलेल्या पद्मनाभम श्रीनारायणांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. चार एकर क्षेत्रात मंदिर निर्माण केले जाणार आहे. परिसरात सर्वकल्याण महापुजा आणि श्रीविष्णु पुराण कथेचे आयोजन संतश्री लोकेशानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत दि.६ ते १२ जानेवारी २०२० पर्यंत होणार आहे.

श्रीनारायण भक्तीपंथाकडून श्रीश्रीनारायणपूरम लोणखेडा येथे निर्माण होणार्‍या श्री.पद्मनाभम मंदिराच्या आवारात मोठा मंडप उभारण्यात आला आहे. श्रीश्रीनारायणपूरम येथे भारतातील दुर्लभ आणि दिव्यभव्य मंदिर या परिसरात निर्माण केले जाणार आहे. चार एकर क्षेत्रात ३६ हजार स्केअरफूट जागेत केरळ येथे असलेल्या पद्मनाभम श्रीनारायण मंदिरासारखी ११ फूटाची शेषशायी विष्णु भगवानची अष्टधातुची मूर्ति या मंदिरामध्ये स्थापित होणार आहे. संतश्री लोकेशानंदजी महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण होणारे भारतातले हे पहिलेच मंदिर राहणार असून या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

देशभरातून या स्थळाला भेट देणार्‍यांची संख्या भविष्यात मोठी असणार आहे. दि.६ ते १२ जानेवारीपर्यत रोजी सकाळी ९ वाजता  श्रीविष्णुपुराण कथा व सर्व कल्याण महापूजा  होणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मंत्र दिक्षा महोत्सव होणार आहे. श्रीनारायण भगवानांच्या महापूजेमध्ये अनेक यजमान विष्णु मूर्तिचे षोडशोपचार पुजन करणार आहे. भक्ती पंथाचे मुख्य या महापुजेसाठी अनेक राज्यातून व जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांचे व कार्यक्रमाचे आयोजक कैलास गोयल, शांतीलाल पाटील, मणीलाल पटेल, अशोक रामदास पाटील, जितेंद्र रावसाहेब पाटील, पप्पूराम दुर्गाराम चौधरी, रमणभाई माणिभाई पटेल, नरेंद्र पाटील, कैलाश पाटिल, जगदीश पाटिल, विश्वजीत क्षीरसागर आदींनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!