Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारनंदुबारकरांनो लक्ष द्या : ...तर नळ जोडणी तुटणार

नंदुबारकरांनो लक्ष द्या : …तर नळ जोडणी तुटणार

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जुन्या स्मशान भुमीच्या (Cemetery land) नुतनीकरणासाठी 91 लाख तर मटन व मच्छी मार्केटच्या नुतनीकरणासाठी (Renewal) 16 लाख रुपये पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून मंजूर केले आहेत. हा निधी (Funding) लवकरच पालिकेला मिळणार आहे. दरम्यान, मालमत्ता कर (Property tax) न भरणार्‍या नागरिकांची नळ जोडणी (Plumbing connection) 1 मार्चपासून तोडण्याची मोहिम (Breaking campaign) राबविणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी दिली.

- Advertisement -

शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले, नंदुरबारात दोन स्मशानभूमी आहेत. त्यातील जुन्या स्मशानभुमीची (Cemetery land) दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पालिकेने कोरोना काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले होते. आता पालिकेकडून या स्मशानभूमीचे नुतनीकरण (Renewal) करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीडीसीकडे निधीची (Funding) मागणी केली होती. पालकमंत्री(Guardian Minister) के.सी. पाडवी (K.C. Padvi) यांनी मागणी मंजूर केल्याने यासाठी 91 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय मटन व मच्छी मार्केट च्या नुतनीकरणासाठी देखील डीपीडीसीने 97 लाख रुपये मंजूर केले आहेत.

यंदा नागरिकांनी मालमत्ता कर (Property tax) भरण्याबाबत उदासिनता दाखविली आहे. त्यामुळे कर भरणा अगदीच कमी झाला आहे. नागरिकांनी कर भरावा यासाठी थेट कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जे नागरिक कर भरणार नाहीत त्यांची नळ जोडणी (Plumbing connection) 1 मार्चपासून खंडीत (Broken ) करण्यात येणार आहे.

मोठ्या थकबाकीदारांची (arrears) नावे शहरातील मुख्य चौकात होडींग लावून जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या (municipality) सर्व संबधीत कर्मचार्‍यांना महिनाभर आता कर वसुलीचेच करण्यास सुचित केले आहे.

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या विरचक प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा (Water supply) केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत झाली आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे 1 मार्चपासून एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा केला जाईल. सहा महिने पाणीसाठा पुरवायचा असून पाणी जपून वापरावे असे आवाहनही रघुवंशी यांनी केले.

दरम्यान नंदुरबार शहरातील रेल्वे बोगद्याच्या श्रेयवादाबाबत बोलतांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगीतले की,नंदुरबारच्या खा.हिना गावीत या खासदार बनन्यापुर्वी नंदुरबार शहरातील रेल्वे बोगदा मंजुर झाला आहे.त्यामुळे त्यांचे समर्थक श्रेय वाद घेण्याचा केवीलवाना प्रयत्न करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या