Type to search

नंदुरबार

प्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत

Share

शहादा/प्रकाशा | ता.प्र./वार्ताहर – तालुक्यातील प्रकाशा येथे बिबटयाची मादी मृतावस्थेत आढळून आली आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला असून वनविभागाच्या नियमानुसार त्याचा अंत्यविधी करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि. २० जुलै रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास तालुक्यातील प्रकाशा येथील जितेंंद्र भरत पाटील यांच्या गट क्रमांक ९५०/१ या शेतामध्ये अडीच ते तीन वर्ष वयाची बिबटयाची मादी मृतावस्थेत आढळून आली. याबाबत वनविभाग तसेच पोलीसांना माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तसेच पोलीस व तलाठी घटनास्थळी उपस्थित झाले. बिबटयाची तपासणी केली असता तो मृत होता. याबाबत शहादा येथील सहाय्यक पशुसंवर्धन चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सागर परदेशी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी योगेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर अवयवाचे नमुने पुढील तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठविले जाणार आहेत. त्यानंतर नियमानुसार बिबटयाचा अंत्यविधी करण्यात आला.

सदर कारवाई उपवनसंरक्षक एस.बी.केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक आर.एच.झगडे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल एस.एस.इंदवे, व्ही.टी.पदमोर, ए.एम.बोरुडे, वनरक्षक एस.बी.मुकडे, प्रविण वाघ, बी.अर.शहा, डी.ए.परदेशी, के.एम.पावरा, नईम मिर्झा संजय वाघ यांनी केली. यावेळी प्रकाशा औटपोस्टचे गौतम बोराडे, शोएब शेख, तलाठी डी.एम.चौधरी, रामचंद्र पाटील, भरत पाटील, अजय वाणी, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!