Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

शहाद्यात आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

Share

नंदुरबार । आगामी विधानसभा व अन्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या दि. 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता शहादा-दोंडाईचा बायपास रस्त्यावरील मिरा प्रताप लॉन शहादा येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकांची रणनिती आखण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने लढा उभारण्याची तयारी सुरु केली आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून शहादा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आगामी विधानसभा व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी नवीन रणनिती आखण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील जुळविली जाणार आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्यांच्या समवेत पक्षाचे जिल्हा निरीक्षक नाना महाले, प्रभारी उमेश पाटील, प्रदेश सदस्य तथा माजी आ.शरद गावीत, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातून विधानसभा मतदार संघांसाठी स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यात अनेक जण इच्छुक आहेत, त्या इच्छुकांच्या मुलाखती देखील या मेळाव्या नंतर घेतल्या जाणार आहे. म्हणून सर्व इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!