Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबार जिल्हयात दमदार पाऊस, वीज पडून घराचे नुकसान, 30 टक्के पावसाची नोंद

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 30.45 टक्के पाऊस झाला आहे. जिल्हयात एकुण 1 हजार 527 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्हयात 253 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल रात्री शहरातील ज्ञानदीप सोसायटीत वीज पडून घराला तडे गेले आहेत. तर पावसामुळे शहरातील सर्व सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांची पडझडही झाली.

नंदुरबार शहरासह जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून दमदार पुनरागमन केले आहे. सलग दोन दिवस रात्री 11 ते 5 वाजेदरम्यान जिल्हाभरात वीजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील नदीनाल्यांना पाणी आले आहे. काल रात्री जिल्हयात सरासरी 253 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबारात 61 मि.मि, नवापूर 70 मि.मि., तळोदा येथे 39 मि.मि., अक्कलकुवा येथे 47 मि.मि., शहादा येथे 28 मि.मि., अक्राणी येथे 8 मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत नंदुरबार तालुक्यात 232 मि.मि., नवापूर तालुक्यात 175 मि.मि, तळोदा तालुक्यात 352 मि.मि., अक्कलकुवा तालुक्यात 273 मि.मि., शहादा तालुक्यात 233 मि.मि., अक्राणी तालुक्यात 263 मि.मि. अशी एकुण 1 हजार 527 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात सरासरी 30.45 टक्के पाऊस झाला आहे.

काल रात्री 12 वाजेपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे दोन ते तीन तास दमदार पाऊस सुरुच होता. यावेळी वीजांचे भयानक तांडव सुरु होते. नंदुरबार शहरातील ज्ञानदीप सोसायटीतील रहिवासी राजेंद्र नथ्थू पाटील यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांच्या घराला तडे गेले आहेत. भिंतीला भगदाडही पडले आहेत. पाण्याची टाकी तसेच पाण्याचे पाईपही फुटले आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, काल झालेल्या पाव

सामुळे अनेक घरांची पडझड झाली असून वृक्ष व वीजताराही उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. या दमदार झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील नदीनाल्यांना पाणी आले असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. तसेच शेतकर्‍यांवरील दुबारपेरणीचे संकटही टळले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी 21 जुलैपर्यंत जिल्हयात 1 हजार 609 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यात नंदुरबार तालुक्यात 146 मि.मि., नवापूर तालुका 305 मि.मि, शहादा तालुका 217 मि.मि., तळोदा तालुका 271 मि.मि., अक्कलकुवा तालुका 346 मि.मि.तर अक्राणी तालुक्यात 324 मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली होती. गेल्यावर्षाच्या दि. 21 जुलैपर्यंत पडलेल्या पावसाच्या तुलनेत यंदा 82 मि.मि.पाऊस कमी झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!