Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : साकोरा येथील पांझन नदीवरील बंधाऱ्याची भिंत कोसळली

Share

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील पांझन नदीवरील बंधाऱ्याला गळती लागून बंधाऱ्यांची भिंत खाली कोसळल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणांत पाणी साचले होते. शेतकऱ्यांनी यामुळे समाधान देखील व्यक्त केले होते मात्र आज सकाळ पासून बंधाऱ्यातील काही भागातून पाणी लीक होतांना स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. दुपार नंतर मात्र पाण्याचा प्रवाह वाढतच गेला आणि नव्याने बांधण्यात आलेला १७ फूट उंचीचा बांध कोसळला.

काही वर्षांपूर्वी तालुक्यातील वाघदडा वस्तीजवळ १२ फूट उंचीचा पांझन नदीवर एक बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होत होता. स्थानिक शेतकरी यांनी या बंधाऱ्यांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार लोकवर्गणी करून मागील वर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्चून बंधाऱ्याची १७ फूट उंची वाढवण्यात आली. परंतु आज अशा घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या बंधाऱ्याची पिचिंग साठी वापरण्यात आलेली माती मात्र तग धरून होती. परंतु त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ती माती कोसळून पुन्हा लाखो लिटर पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे.

ज्या उद्देशाने ह्या बंधाऱ्याची उंची वाढवण्यात आली होती तो उद्देशच सफल न झाल्याने परिसरातील शेतकरी नाराज झाले असून साकोरा येथील बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या मातीमुळे पाण्याचा काही प्रवाह अडला आहे मात्र माती खचून वाहून जाण्याची शक्यता असल्याने या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!