बहिणीचा खून करणाऱ्या भावाला अटक

0

नांदगाव विशेष प्रतिनिधी |  नांदगाव तालुक्यात सख्या भावाने आपल्या बहिणीचा खून केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर संशयित आरोपी भाऊ राजू मुकणे फरार होता. अखेर आज नांदगाव पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

मुकणे हा सख्या बहिणीचा खून करून फरार झाला होता. तो फरार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा त्याच्या शोधात होती.

यासाठी एक शोध पथक नेमण्यात आले होते. आरोपी राजू मुकणे हा आज (दि. २१) साकोरा परिसरात येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.

पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी पद्मने, पो. ना. रमेश पवार, पोलीस कॉ .पंकज देवकाते यांच्या पथकाने सापळा रचून फरार संशयित आरोपी राजू मुकणे यास ज्ञानेश्वर नगर, साकोरा येथून ताब्यात घेतले.

दरम्यान, राजू  मुकणे यावर गु.र. न. १४२/२०१७ भा. द. वि. न ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास नांदगाव पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*