Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : पुढील तीन दिवस रेल्वेगेट राहणार बंद

Share

नांदगाव : शहरात दळणवळणाचा मार्ग असलेल्या रेल्वेगेटचे काम करण्यात येणार आहे. म्हणून दि.५ ते ७ नोव्हेंबर बंद ठेवण्यात येणार आल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

नांदगाव शहरातील रेल्वेगेट क्रमांक ११४( ए ) ७ नोव्हेंबर बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या ५ नोव्हेंबर पासून ते ७ नोव्हेंबर
काळात रेल्वेगेटचे काम करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.यामुळे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, लेंडीनदी पुलाखालून संपूर्ण वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक व्यवस्था ठप्प होणार आहे.रेल्वेगेट बंदमुळे नांदगाव शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होणार आहे.

नांदगाव रेल्वेगेट क्रमांक-११४ चे रेल्वे लाईन मधील सिमेंट स्पिलर बदलण्यात येणार आहे. दि.५ ते ७ नोव्हेंबर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे.
-मनोज कुमार सिंग, वरीष्ठ निरिक्षकअधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!