Type to search

पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या विकास आराखड्यासाठी ५ कोटींची तरतूद

Breaking News Featured नाशिक

पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या विकास आराखड्यासाठी ५ कोटींची तरतूद

Share

नांदगांव । दि.२० (संजय मोरे) | अतिप्राचीन पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी वनपर्यटन अंतर्गत वन पर्यटन केंद्र मंजूर केलेले असून त्यासाठी विकास कामांच्या आराखड्यास सद्यस्थितीत ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

असून  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत वनहक्क कायद्याअंतर्गत वन विभागाची परवानगी मिळवून पिनाकेश्वर मंदिरावर वीज पोहचविण्यात आली आहे. प्रामुख्याने पिनाकेश्वर मंदिरावर जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी सातत्याने मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक नाशिक) व वनसंरक्षक पूर्व भाग नाशिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचेशी चर्चा करून व त्यांनी केलेल्या सूचनेनुसार दि. १९ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यामुळे लवकरच रस्याचा प्रश्न सुटणार आहे.

तसेच ढेकु खु. येथिल नाथआश्रम परिसराचा देखील वन पर्यटन अंतर्गत विकास व्हावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी वनमंत्री यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यासंदर्भात सकारात्मक आदेश वन मंत्र्यांमार्फत सचिवांना देण्यात आलेले आहे. या परिसराचाही विकास करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार पंकज भुजबळ प्रयत्नशील आहेत. या अगोदरही नांदगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपुरचा छगन भुजबळ  यांच्या माध्यमातून विकास करण्यात आलेला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष  संतोष गुप्ता, आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड, राजेंद्र लाठे, नारायण पवार, विजय पाटील, पंढरीनाथ पवार, अंकुश वर्पे, कैलास तुपे, शिवाजी गायकवाड, विष्णू माळकरी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता  पाटील,  संरक्षक  कापसे, वनक्षेत्रपाल  भंडारी, वनपाल दौंड येथील  ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!