विश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ

0
मनमाड- नांदगाव-मनमाड मतदारसंघात सलग दोन वेळा एक ही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, या मतदारसंघातील जनतेने मला सलग दोन वेळा प्रचंड मतांनी विजयी करून इतिहास घडविला आहे, त्यांचे हे ऋण फेडण्यासारखे नाही. मात्र, त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून, गेल्या 8 वर्षात या मतदारसंघात अनेक भरीव विकासकामे झाली आहेत. विकास कामांची ही गती पुढेही सुरू राहणार आहे.

कासाच्या बाबतीत माझ्या नांदगाव-मनमाड मतदार संघाचा नाशिक जिल्ह्यातच नव्हे; तर महाराष्ट्राला हेवा वाटावा असा तो मला आगामी काळात करायचाय.

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी नांदगाव मतदारसंघासाठी नवखा असतांनादेखील जनतेने मला प्रचंड मतांनी निवडून दिले. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही.

माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास करून जनतेला समस्या मुक्त करण्याचे माझे ध्येय असून, त्या दृष्टीने मी विकासाची कामे करीत आहे. मनमाड पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात मला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, बजेट आणि नाबार्ड आदी मधून 80 कोटी रुपये निधी मिळाला असून, त्यातून विविध कामे करण्यात आली आहे तर काही प्रगतीपथावर आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक येजानेअंतर्गत 70 कोटींची कामे मंजूर झाली आहे, त्यात नगाव-बौळाने-सौंदाणे रस्ता,ससाणे-गिगाव,नांदगाव-साकोर,साकोर-पांझण,जामध यासह इतर रस्त्यांचा समावेश आहे.56 खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या योजनेमुळे या भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.नांदगाव तालुक्यांसाठी नार-पार मांजरपाडा या योजनेतील पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

मनमाडबरोबरच नांदगाव शहराचा देखील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न केले. माणिकपुंज धरणातून 35 कोटींचा पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून त्याचबरोबर या धरणात 150 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित केले जाणार आहे.

नांदगावपासून काही अंतरावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नस्तनपूरला पर्यटन स्थळ करण्यासाठी 14 कोटी 41 लाख 57 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे. घरकुल योजनेंतर्गत नांदगाव मतदारसंघासाठी आपण 4 हजार 776 घरे मंजूर करून आणली. त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणची मागणी असेल त्या मागणीनुसार या योजनेंतर्गत लाभार्थीसाठी घरे मिळणार आहे.

मतदारसंघातील सर्व 105 गावांसाठी नवीन अंगणवाडी इमारतीची शासन दरबारी मागणी केली होती. त्यापैकी अनेक अंगणवाडी बांधण्यात आल्या असून उर्वरित गावांसाठी अंगणवाडीच्या इमारतींना साठी मंजुरी मिळणार आहे. मनमाड शहरात देखील 35 नवीन अंगणवाडी इमारती पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक इमारतीसाठी 4 लाख 50 हजारांचा निधी मंजूर खर्च करण्यात आला आहे .

नांदगाव मतदारसंघातील 65 गावांच्या ग्रामपंचायतीला स्वतःची इमारत नाही, त्यांना हक्काची इमारत मिळावी, त्यासाठी आपण शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. 65 ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी प्रत्येकी सरासरी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर अनेक कामे पूर्ण झाली, तर इतरांची कामे प्रगतीपथावर आहे. उर्वरित ग्रामपंचायतीच्या इमारतींना देखील लवकरच शासनाकडून मंजुरी मिळून निधी मिळणार आहे.

हवामान खात्याकडून शेतकर्‍यांना वेळेवर माहिती मिळावी, यासाठी येसगाव येथे हवामान खात्याचे केंद्र केवळ मंजूरच करून आणले नाही, तर ते सुरूही झाले आहे. यंदा पावसाअभावी मनमाड,नांदगावसह संपूर्ण मतदार संघात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.या समस्येवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध योजना मजूर केल्या आहे.भालूर गटात घरकुल योजना त्याचबरोबर अनेक विकासकामे केली असून, त्यात सिमेंट प्लग बंधारे, गावतळे आदींचा समावेश आहे. अनेक गावात स्मशान भुमी नव्हत्या.

एकूण 39 गावात नवीन स्मशानभूमी बांधण्यात आल्या असून त्यांना 35 लाख 85 हजार रुपये खर्च झाला आहे. या गटात सर्व शिक्षा अभियानांतर्गत 3 कोटी 93 लाख 94 हजार रुपयांच्या निधीतून विविध शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करुन विविध योजना राबविण्यात आल्या. दलित वस्ती योजनेंतर्गत मागासवर्गीयांसाठी सौर कंदील, ताडपत्री आदी वाटप करण्यात आले.

या गटातील 7 गावांमध्ये माती नाले, शिवार रस्ते,गाळ काढणे आदी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामे केली गेली आहे. न्यायडोंगरी गटात देखील भालुर गटाप्रमाणेच विविध विकासकामे करण्यात आली असून त्यात 23 गावांमधील 513 लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. या गटात 7 सिमेंट प्लग बंधारे, 3 गावतळे, एक पाझर तलाव, निर्माण करण्यात आले असून, त्यासाठी 1 कोटी 2 लाखांचा निधी मिळाला आहे.11 गावांत स्मशानभूमी बांधण्यात आली असून, प्रत्येकी अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत.

12 गावात अंगणवाडी इमारती मंजूर करण्यात आल्या असून तर दलित वस्ती योजनेंतर्गत 18 कॉक्रीट रस्ते,4 गटारी,1 सार्वजनिक शौचालय,2 जोडरस्ते करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत या गटात 15 गावांत माती नाल बांध,पाझरतलाव दुरुस्ती,गाळ काढणे अशी कामे झाली आहेत तर शिक्षण विभागात नवीन खोल्या बांधणे, खोल्यांची दुरुस्ती व इतर विविध राबविण्यात आलेल्या योजनेवर 1 कोटी 33 लाखांचा निधी खर्च झाला आहे.

या गटात 25 गावांमधील 452 लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.साकोरा गटातही मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे पूर्ण झाली. काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तर काही मंजूर होणार आहेत. या गटात देखील घरकुल योजना राबवून 25 गावातील 452 लाभार्थीना घरे मिळाली आहे. 6 सिमेंट प्लग बंधारे, 6 गावतळे तर 1 साठवणूक बंधारा दुरुस्त करण्यात आला. 16 गावांसाठी एक नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली,

त्याच्यावर 29 लाख 85 हजार रुपये खर्च करण्यात आले. 2009 ते 2018 पर्यंत सर्व गटातील गावांसाठी अंगणवाडी इमारत मंजूर होवून पूर्ण झाली आहे. गवळीवाडा,जळगाव, कर्दळी, पोखरी याठिकाणी प्रसूतीगृह बांधण्यात आले. मल्हारवाडीत खंडेराव महाराज मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यात आले, तर अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. 11 काँक्रीट रस्ते,1 समाजमंदिर,1 स्त्री शौचालय,3 गटारी,1 विहीर दुरुस्ती झाली आहे. 1 पाण्याची टाकी देखील पळाशी येथे बांधण्यात आली आहे.

मागासवर्गीयांसाठी विविध योजना व इतर विकासकामे करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेज कार्यक्रमांतर्गत 1 कोटी 84 लाख 49 हजार रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील कळवाडी गटातही इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. येथेही पाझरतलाव दुरस्ती, सिमेंट प्लग बंधारे, अंगणवाडी इमारती, रस्ते बांधण्यात आले.

चिखलआहोळ गट,निमगाव गट,चंदनपुरी गण, सौंदाणे गट,जळगांव निबांयती गण,या सर्व भागात देखील स्मशानभूमी,सिमेंट प्लग बंधारे, अंगणवाडी इमारत, घरकुल योजना यांसह विविध विकासकामे करण्यात आली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी छोटे बंधारे,सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे.ज्या नद्यावर पूल नव्हते तेथे पूल बांधण्यात आले आहे.घरकुल योजनेंतर्गत नांदगाव मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करुन आणली.

त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणची मागणी असेल त्या मागणीनुसार या योजनेंतर्गत लाभार्थीसाठी घरे मिळणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली सार्वजनिक शौचालय,जोडरस्ते करण्यात आली.मतदार संघातील सर्व भागात स्मशानभूमी,सिमेंट प्लग बंधारे,अंगणवाडी इमारत,घरकुल योजना यांसह विविध विकासकामे करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

*