हातात मोटारीची वायर घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

0

बोलठाण (वार्ताहर)  ता. १७ : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी तुकाराम रंगनाथ सोनवणे (वय. ४९) यांनी काल संथ्याकाळी जीवनयात्रा संपविली.

विविध कार्यकारी सोसायटी, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया व खासगी असे मिळून १२ लाखांचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी १६ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विहिरीवरील विद्युत मोटारच्या चालू वीज प्रवाहाची वायर हातात घेऊन आत्महत्या संपविली.

घरा समोरील गाय, बैल अचानक जोरात हंबरायला लागल्याने त्यांच्या सुनबाई घराच्या बाहेर आल्यानंतर घडलेली घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने शेजारील शेतकर्यांना मदतीला बोलविले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालविली होती.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले दोन मुली ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास  अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदगाव तालुक्यातील महिनाभरातील ही तिसरी आत्महत्या आहे.

LEAVE A REPLY

*