बँकेच्या वसूली नोटीसनंतर शेतकऱ्याची पेटवून घेत आत्महत्या

0

नांदगाव (प्रतिनिधी) ता. २४ : बँकेची कर्जवसुलीची नोटीस मिळताच साकोरा, ता. नांदगाव येथील शेतकरी अशोक चिमा बोरसे (५५) आत्महत्या केली.

आज सकाळी ९ च्या सुमारास घटना घडली. त्यांनी स्वत:ला घरात कोंडून पेटवून घेत जीवनयात्रा संपविली.

उपचारासाठी नेताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २० दिवसात नांदगाव तालुक्यात झालेली ही पाचवी शेतकरी आत्महत्या आहे.

LEAVE A REPLY

*