Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जातेगांव येथे सर्पदंश झाल्याने बैलाचा मृत्यु

Share

नांदगाव। प्रतिनिधी
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुखवलेला बळीराजा बैल पोळा मोठया उत्साहत साजरा करत असताना जातेगावमधील शेतकरी युसूफ शेख यांच्या बैलास एन पोळ्याच्या दिवशीच सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील युसुफ शेख यांची परिस्थिती हलाखीची असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर वेळी ते मोलमजुरी करतात. ऐन हंगामात बैल गेल्यामुळे पुढे कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डॉ.अनिल देवकर यांनी तपासणी केली असून त्याबाबतचा अहवाल दिला आहे. युसुफ शेख या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!