Type to search

Breaking News maharashtra

प्रा. डॉ. प्रीतम गेडाम यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

Share

नाशिक | समाजात देत असलेल्या वेगवेगळ्या योगदानासाठी विविध क्षेत्रातून पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध संस्था गौरव करतात. नुकताच महात्मा कबीर समता परिषदेकडून देण्यात येणारा तसेच महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राध्यापक डॉ. प्रीतम गेडाम यांना प्रदान करण्यात आला.

30 डिसेंबर 2018 रोजी नांदेड शहरातील  स्व. शंकरराव चव्हाण सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. गेडाम आपल्या लेखनीद्वारे नेहमी निस्वार्थपणे वेगवेगळ्या सामाजिक समस्या व निवारण जनजागृती संबंधी उपाययोजनांवरती कार्य केले आहे.

कार्यक्रमाचा प्रथम सत्रात राज्यातील विद्रोही कवींचे कवी सम्मेलन झाले. त्यानंतर दुस्या सत्रात व्याख्याने व तिसऱ्या क्षेत्रात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून, खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, मुंबईचे कुलगुरू डॉ. बलदेवसिंह चौहान, आमदार डी.पी. सावंत, अमरभाऊ राजूरकर, आमदार हेमंत पाटील, आमदार रामपाटील रातोळीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगांवकर, महापौर शीला किशोर भवरे आदि उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!