Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद केली रद्द

Share

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांवर उत्तरे देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली नाना पाटेकर यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य आणि सामी सिद्दीकी यांनी या प्रकरणावर आपली भुमिका मांडण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अद्यापपर्यंत या संदर्भात अधिकृत खुलासा समोर आलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून तनुश्री आणि नाना पाटेकर हा वाद पेटला आहे. या सर्व आरोपांवर मौन बाळगून असलेले नाना पाटेकर ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार होते. नाना पाटेकर यांची बाजू नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येकालाच होतं. त्यामुळे नाना पाटेकर पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, मात्र ऐनवेळी त्यांनी ही परिषद रद्द केली आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या परिषदेत नाना पाटेकर यांच्यासोबत गणेश आचार्यदेखील अनेक प्रश्नांना उत्तर देणार होता.मात्र नाना पाटेकर यांनी ही परिषद रद्द केल्याचं समजत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!