नमस्ते इंग्लंडचा ट्रेलर लॉंच

0
मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांची मुख्य भूमिका असणारा ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘नमस्ते इंग्लंड’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. अनेक वर्षांनंतर हे दोघं पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. यापूर्वी ‘इशकजादे’ या चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. या दोघांनीही या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. येत्या १९ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘नमस्ते इंग्लंड’ची धूरा सांभाळणाऱ्या विपुल शाह यांनी यापूर्वी ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. ११ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विशेष म्हणजे या जोडीने प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. त्यामुळे अर्जुन- परिणीतीची जोडी प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*