Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

‘मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे इस्लामविरोधी’

Share

सहारनपूर:  मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे हे इस्लामविरोधी असल्याचे सांगत त्याविरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. दारुल उलुम देवबंद या संस्थेने हा फतवा काढला आहे. मुस्लिम महिलांनी नखांवर नेलपॉलिश लावणे हे इस्लाममध्ये मान्य नाही तसेच ते बेकायदा आहे. मुफ्ती इशरार गरुआ यांनी मुलाखतीत हा फतवा लागू केल्याचे म्हटले आहे.

मुस्लिम महिलांनी नेल पॉलिश लावणं इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे नेल पॉलिश ऐवजी नखांवर मेहंदी लावावी, असं मुफ्ती इशरार गौरा यांनी म्हटलं आहे. देवबंदने यापूर्वीही वादग्रस्त फतवे जारी केलेले आहेत. मुस्लिम महिलांनी मेहंदी लावण्यास विरोध करणारा फतवाही गुरुवारी जारी करण्यात आला होता. तसेच परपुरुषांच्या हातून बांगड्या भरण्यासही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर शरीराला व्हॅक्सिंग लावणं सुद्धा शरीयाच्या विरोधात असल्याचा फतवा देवबंदने काढला होता.

दारुल उलुम देवबंद ही एक शैक्षणिक संस्था आहे. जगभरातल्या मुस्लिमांच्या मनात या संस्थेबद्दल विशेष आदर आहे. मात्र त्यांच्या अशा काही फतव्यांमुळे पुन्हा एकदा ही संस्था त्यांच्या चर्चेत आली आहे. ज्यानुसार महिलांनी नेलपॉलिश लावू नये असे या संस्थेने म्हटले आहे. तसा फतवा काढण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!