Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सध्या एवढंच माझ्या डोक्यात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार : शरद पवार

Share
महाराष्ट्राप्रमाणे देशातही महाविकास आघाडी होऊ शकते - शरद पवार, Latest News Shard Pawar Statement Ahmednagar

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात येईल आणि पाच वर्षे कायम राहील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर दौऱ्यावर असतांना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले तर दुसरीकडे अद्यापही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. अशावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिक नंतर आता नागपूर येथे ओला दुष्काळ दौरा केला. यावेळी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या नुकसानीची तपशीलवार माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

तसेच एका पत्राकाराने विचारले कि, फडणवीस यांनी दावा केला कि भाजप सरकार येणार, तसेच खिचडी जास्त दिवस टिकणार नाही यावर पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर देत सांगितले कि, ते मला माहित नाही, सध्या तर माझ्या डोक्यात एवढाच आहे कि, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार… राजकीय प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!