बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे ॲकॅडमी सुरु करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0

नागपूर : बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करुन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-1 व वर्ग-2 या पदावर 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

*