नाचणीचा पौष्टिक केक

0
स्वस्त धान्य असणाऱ्या नाचणीत अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे. नाचणी मध्ये ३०० ते ३५० मिली ग्राम प्रति १०० ग्रॅम एवढे कॅल्शियम असणारे नाचणी हे एकमेव धान्य आहे.

याशिवाय नाचणीमध्ये एकूण कर्बोदकांपैकी १८% तंतुमय घटक असल्यामुळे त्याला पोषण मूल्य आहेत. तसेच जीवनसत्व अ, ब, फौस्फर्स आणि उत्तम प्रतीचे प्रथिने हे सर्व नाचणीमध्ये असल्यामुळे नाचणी वाढत्या वयातील मुले, गरोदर महिला आणि वयस्कर मंडळी या सर्वांना उत्तम आहार होऊ शकतो.

नाचणीचे सत्व हा पारंपरिक पदार्थ असून, या शिवाय नाचणीपासून आपण अनेक विविध पदार्थ बनवू शकतो जसे नाचणीचा खाकरा, नाचणीचे बिस्कीट, नाचणीची बर्फी आणि बरेच काही. सद्धया मार्केट मध्ये अनेक बेकरी पदार्थांना खूप मागणी आहे. पण बरेच बेकरी पदार्थ हे मैद्या पासून बनवले जातात.

पण मैदापासून अनेक आजार वाढतात म्हणून या बेकरी पदार्थांचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. सध्या  लोक स्वास्थ्याबद्दल जागरूक असल्यामुळे, पोषक अन्न पदार्थांची निवड करण्यात त्यांचा कल असतो. सामान्यतः केक हा मैद्या पासून बनवला जातो, पण त्या ऐवजी जर नाचणी वर्धित केक बनवला तर त्याचे पोषण मूल्य वाढतील शिवाय नाचणी खायला न आवडणाऱ्याना सुद्धा नाचणी आहारात समाविष्ट करता येईल.

नाचणी केकसाठी लागणारे साहित्य:

नाचणीची पीठ: १०० ग्रॅम

मैदा: १०० ग्रॅम

कंडेन्सड मिल्क: ४०० ग्रॅम

बेकिंग पावडर: १ टी स्पून

बेकिंग सोडा: १ टी स्पून

अरॅटेड वॉटर: २०० मिली

कोको पावडर: २ टेबल स्पून

बटर: ६ टेबल स्पून

नाचणी केक बनवण्याची प्रक्रिया:

१. सर्व प्रथम नाचणी पीठ आणि मैदा एकत्र करून चालून घावे.

२. या चाललेल्या पिठात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करून पुन्हा चालून घावे.

३. दुसऱ्या भांड्यात बटर, कोको पावडर, कंडेन्सड मिल्क करून हे मिश्रण ब्लेंडरने एक ते दीड मिनिटासाठी फेटून घ्यावे.

४. या फेटलेल्या मिश्रणात चाळलेले पीठ मिक्स करावे आणि २०० मिली एकत्र अरॅटेड वॉटर मिक्स करून पुन्हा अर्धा मिनिट साठी फेटून घ्यावे.

५. हे तयार केक बॅटर, केक मोल्ड मध्ये ओतून बेकिंग ओव्हन मध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला २५ मिनिट साठी बेक करावे.

६. बेकिंग झाल्यानंतर मोल्ड मधील केक एका चाळणीवर गार झाल्यानंतर उलट करून बाहेर काढावा.

७. नाचणी केक बेस तयार.

केकचे आयसिंग :

१. तयार केक बेसला मधून कापून घ्यावे. कापलेला एक भाग तसाच ठेवून त्यावर साखरेचा ५० डिग्री ब्रिक्सचा सिरप ओतावे.

२. या सिरपणे ओल्या केलेल्या केक बेसवर फेटलेले व्हिपिंग क्रीम चा थर लावून घ्यावा.

३. या क्रीमच्या ठरवर पुन्हा केक बेसचा दुसरा भाग ठेवून त्यावर साखरेचा ५० डिग्री ब्रिक्सचा सिरप ओतावे.

४. या पूर्ण केक बेस ला वरून आणि सभवतीने क्रीमने कव्हर करावे.

५. आयसिंग ब्याग मध्ये वितळवलेले चॉकोलेट घेऊन, ब्यागला छोटे व्होल करावे.

६. केकच्या कडेकडेने चॉक्लेटने भरलेली आयसिंग ब्याग पकडून चॉकलेट ड्रॉप करत संपूर्ण केकला डेकोरेट करावे.

७. केकवर चॉकलेट स्लॅब किसून पसरवावा.

८. केकच्या कडेने १०-१२ चेरी लावून अधिक आकर्षक केक बनवावा.

९. केक तयार झाल्यानंतर कमीत कमी २ तास फ्रीझ मध्ये गार करून घ्यावा.

रेसिपी : सोनाली गायकवाड, दीपश्री पवार, सोनल चौधरी (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

 

LEAVE A REPLY

*