शासनाच्या तीन वर्षात सहकाराची वाताहत

0

शिवाजीराव नागवडे; नागवडेचा बॉयलर पेटला

 

श्रीगोंदा, लिंपणगाव (प्रतिनिधी, वार्ताहर) – केंद्र व राज्य शासन सहकार क्षेत्राला कोणतीही मदत करीत नाही. परिणामी गेल्या तीन वर्षांत सहकाराची पूर्णतः वाताहत झाली आहे. साखर उद्योगाबाबत सरकारची धोरणे दरिद्री असल्याची टीका करीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी शासन साखर उद्योगासमोर नवनवीन अडचणी निर्माण करीत असल्याचा आरोप केला.

 

नागवडे कारखान्याच्या 44 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी नागवडे म्हणाले, या शासनाने सामान्यांना भूलथापा मारल्या. नोटबंदी सारखे निर्णय लादून लोकांचे खिसे रीकामे केले. गेल्या काही वर्षांत खासगी कारखाने झपाट्याने वाढलेल्या सहकारापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. मात्र खासगी कारखान्यांना ऊस देणे शेतकर्‍यांना नुकसानकारक असल्याचे नागवडे म्हणाले.

 

 

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, राज्य शासन वेळोवेळी साखर उद्योगाबाबत निर्णय बदलत आहे. यामुळे सहकारी कारखाने आणि शासनाच्या धोरणांत तफावत निर्माण होत आहे. उत्पन्न वाढीसाठी शेती व्यवसायात ठिबक सिंचन करण्याला पर्याय नाही. यावर्षी कारखाना 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार असून शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा.

 

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या माहिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर, अर्चना गोरे, सुरेखा लकडे, प्रेमराज भोयटे, हेमंत नलगे, अरुण पाचपुते, योगेश भोयटे, राजकुमार पाटील, राजू गोरे, प्रशांत दरेकर, पं. स. सदस्य जिजाबापू शिंदे, कैलासराव पाचपुते, अनिरूद्ध पाचपुते, नानासाहेब नेटके, अ‍ॅड. बाळासाहेब काकडे, ज्ञानदेव रायकर, सोपान थिटे, नानासाहेब इथापे, झुंबराव रोडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सरव्यवस्थापक प्रविण शिंदे आदीसह कामगार, शेतकरी आदी उपस्थित होते.

 

जगताप व राजळे यांना श्रद्धाजंलीजगताप व राजळे यांना श्रद्धाजंली 

श्रीगोंदा कारखान्याचे बॉयलर प्रज्वलन कार्यक्रम सुरु होतांना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलीकराव जगताप यांच्या निधनाची माहिती मिळाल्याने कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कुंडलिकराव जगताप व पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

*