Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर जिल्ह्यात फळपीक विमा योजना लागू

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – खरीप हंगामात नैसर्गिक संकटापासून शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी सरकारने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहारासाठी लागू केली आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळ घटक धरून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन घटकांच्या धोक्यापासून पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.

या योजनेतून डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी या फळपिकांचा विमा उतरवला जाणार आहे. पेरु, संत्रा, लिंबू या फळपिकांच्या विम्याचा हप्ता भरण्यासाठी 14 जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. चिकू, मोसंबी या फळपिकांच्या विम्याचा हप्ता भरण्यासाठी 1जुलैपर्यंत तर डाळिंबसाठी 15 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. डाळिंबासाठी 92 आणि चिकूसाठी 53 महसूल मंडळांचा समावेश आहे. कमी आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होते.

त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. या योजनेंतर्गत चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी या फळपिकांचा विमा उतरवला जाणार आहे. पिकनिहाय विमा योजना राबविण्यात येणारे महसूल मंडळे-
डाळिंब- नगर-सावेडी, कापूरवाडी, भिंगार, नागापूर, चिंचोडी पाटील, वाळकी, रूईछत्तीशी, केडगाव, जेऊर, चास. पारनेर-पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळीढोकेश्‍वर,पळशी, सुपा. श्रीगोंदा-श्रीगोंदा, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिभंळा, देवदैठण, कोळगाव.

कर्जत- कर्जत, राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही.

जामखेड- अरणगाव, खर्डा, जामखेड, नान्नज, नायगाव. शेवगाव- शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरंडजळगाव, एरंडगाव, बोधेगाव, चापडगाव. पाथर्डी-पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळीमानूर, करंजी, मिरी, कोरडगाव.

नेवासा-नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, नेवासा खुर्द, सोनई. राहुरी-राहुरी बुद्रुक, सात्रळ, तहाराबाद, देवळाली, ब्राम्हणी, वांबोरी, टाकळीमिया.

संगमनेर-संगमनेर बुद्रुक, धांदरफळ बु., आश्‍वी बु., शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर,पिंपर्णे.

अकोले-अकोले, वीरगाव, कोतूळ, ब्राम्हणवाडा, राजूर, समशेरपूर. कोपरगाव- रवंदे, सुरेगाव, पोहेगाव, दहेगाव बोलका, कोपरगाव. राहाता-राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा.

श्रीरामपूर- उंदिरगाव, टाकळीभान, बेलापूर.
पेरू- नगर-जेऊर, कर्जत-भांबुरा, राहुरी-वांबोरी, टाकळीमिया, देवळाली.

पाथर्डी-करंजी.

कोपरगाव-रवंदे, सुरेगाव, कोपरगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव.

राहाता-राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा.

श्रीरामपूर-श्रीरामपूर,उंदिरगाव, टाकळीभान.

नेवासा- नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, चांदा, घोडेगाव, सोनई, कुकाणा, वडाळा बुद्रुक.

चिकू- नगर-सावेडी, नागापूर, चिंचोडी पाटील, वाळकी, रूईछत्तीशी, केडगाव, जेऊर, चास. पारनेर-पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळीढोकेश्‍वर,पळशी, सुपा.

श्रीगोंदा-श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, चिभंळा, कोळगाव. नेवासा-नेवासा बु, सलाबतपूर, वडाळा बहिरोबा, नेवासा खु, कुकाणा,चांदा.

शेवगाव-शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगावशे, एरंडगाव.

राहुरी-देवळाली, वांबोरी.

राहाता-राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा.

कर्जत-कर्जत, राशिन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही. कोपरगाव-रवंदे, सुरेगाव, कोपरगाव, दहेगाव बोलका, पोहेगाव.

जामखेड-नायगाव.

पाथर्डी- कोरडगाव.
लिंबू- श्रीगोंदा-श्रीगोंदा, पेडगाव, काष्टी, चिंभळा, बेलवंडी, देवदैठण, मांडवगण, कोळगाव. कर्जत-कर्जत, राशिन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही.

संगमनेर-धांदरफळ बु., शिबलापूर.

जामखेड-अरणगाव, जामखेड, नान्नज, नायगाव, खर्डा.

मोसंबी- नगर-कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचांडी पाटील वाळकी, चास, रूईछत्तीसी.

शेवगाव-चापडगाव, एरंडगाव, शेवगाव, भातकुडगाव,बोधेगाव, ढोरजळगाव शे. नेवासा-चांदा, घोडेगाव, सलाबतपूर.

पारनेर-वाडेगव्हाण, निघोज. श्रीगोंदा-बेलवंडी, चिंभळा, देवदैठण,कोळगाव.

कर्जत-मिरजगाव.

राहुरी-वांबोरी.

पाथर्डी-पाथर्डी, करंजी, मिरी, टाकळीमानुर, कोरडगाव.
संत्रा- नगर-कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचांडी पाटील वाळकी, चास, रूईछत्तीसी, सावेडी.

नेवासा-चांदा, घोडेगाव, सलाबतपूर. नेवासा, कुकाणा, घोडेगाव, वडाळा बहिरोबा.

राहुरी-वांबोरी.

पाथर्डी-पाथर्डी, करंजी, मिरी, टाकळीमानुर, माणिकदौंडी.

कर्जत-मिरजगाव.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!