रायगड पुर्ननिर्माणसाठी नगरच्या जगनाथ भोर यांची निवड

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड पुर्ननिर्माण व पायाड जिजाऊ समाधी जिर्णोध्दाराची घोषण केलेली आहे. यासाठी पुरातत्व विभागाने ना हरकत दिल्याने या दोन्ही ठिकाणाचा विकास जलदगतीने होणार आहे.
या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून नगरच्या सुपूत्र जगन्नाथ भोर यांची निवड झाली आहे. भोर सध्या भंडारा अतिरिक्त जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होते.
रायगड पुर्ननिर्माण व पायाड जिजाऊ समाधी स्थळ रायगड जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित येतात. या स्थळांचा विकास करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे. या विभागावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण आहे.
आता रायगड पुर्ननिर्माण व पायाड जिजाऊ समाधी जिर्णोध्दाराचे प्रशासकीय काम आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भोर यांच्यावर राहणार आहे. या ठिकाणी ऐतिहासिक घाटणीने व वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी भोर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवड केली आहे.
भोर यांनी नगर जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर उत्कृष्ठ काम केलेले आहे. आता रायगडच्या विकासासाठी त्यांची निवड झालेली असून मंगळवारी ते हजर होणार आहे. भोर यांना यापूर्वी यशवंत पंचायत राज अभियानाचा उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

*