नगरकरांना दोन दिवस पेट्रोल मिळाले स्वस्त

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिले दोन दिवस तरी नगरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला. नगर शहरात परवाच्या तुलनेत काल पेट्रोल 24 पैशांनी, तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त झाले.
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली होती. नगरच्या पंपावर शुक्रवारी पेट्रोलचा भाव 75.57 तर डिझेलचा भाव 58.62 प्रतीलिटर इतका होता. शनिवारी भाव कमी होऊन पेट्रोल 75.33 तर डिझेल 58.44 रुपये लिटर झाले.
आता रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे दर बदलणार आहेत. नगरसह विविध शहरांतील हे दर आज सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहून त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलले जात आहेत. 

LEAVE A REPLY

*