Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’साठी बिग बी नागपुरात

Share
मुंबई – मराठी चित्रपट ‘सैराट’च्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक अडचणींनंतर अमिताभ बच्चन यांनीही चित्रपटासाठी तारखा दिल्याने चित्रपट पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत. या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना नागपुरात राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ठग्ज ऑफ हिंदुस्थान’, कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा ‘झुंड’ सिनेमासाठी दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे हे स्वप्नासारखे आहे. ते माझे आवडते व्यक्ती आहेत. ते प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसतात व ते पात्राला योग्य न्याय देतात. या सिनेमातील इतर कलाकार नवोदीत आहे आणि नवोदीत कलाकारांसोबत काम कसे करून घ्यायचे हे मला माहीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!