दोन कोटींचे देणे अन् 500 कोटींची जागा अडचणीत

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या प्रिटींग प्रेसमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या 8 कर्मचार्‍यांचे न्यायालयाच्या आदेशानूसार 1990 पासून पगार आणि त्यावर 12 टक्के व्याजाची रक्कम असे एकूण 2 कोटी रुपयांच्या देणी देण्यासाठी महसूल विभागाने येत्या 27 तारखेला जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नगर शहरातील 15 एकर जागेचा निलाव ठेवला आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासाठी तातडीने संबंधीत कर्मचारी आणि प्रशासन यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झाली.

जिल्हा परिषदे मार्फत प्रिटींग प्रेस चालविण्यात येत होती. मात्र, ही प्रेस बंद पडल्यावर प्रशासनाने ही बंद केेली. दरम्यान, प्रेसच्या उत्पन्नावर कर्मचार्‍यांचे पगार करण्यात यावेत, या तत्वावर सरकारने प्रेसला परवानी दिली होती. मात्र, तत्कालीन अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही 1990 पासून या प्रेस कर्मचार्‍यांचे पगार दिले गेले नाहीत. यामुळे या कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी संबंधीत कर्मचार्‍यांच्या पगारासाठी जिल्हा परिषदेच्या जागेवर संबंधीत कर्मचार्‍यांची नावे लावण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडे त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही महिन्यांपूर्वी नगर तहसीलदार यांनी याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवून जिल्हा परिषदेची शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी 15 एकर जमीनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी येत्या 27 तारखेला लिलाव ठेवण्यात आला आहे. या जागेची सध्याच्या बाजार भावात 500 कोटी रुपये किंमत आहे. ही बाब सभेसमोर आल्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संदेश कार्ले, माधवराव लामखडे, राजेश परजणे,एस. कातोरे, प्रताप शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी यावेळी झालेल्या चर्चे सभागी होत, या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याच्या सुचना अर्थ विभागाला दिल्या.

LEAVE A REPLY

*