अहमदनगर | प्रतिनिधी
नगर अर्बन बँक निवडणुकीसाठी (Nagar Urban Bank Election) सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत २३ अर्ज दाखल झाले होते.
- Advertisement -
सोमवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असून एकूण दाखल ८१ अर्जामध्ये दुपारी ३ पर्यंत भर पडणार होती.
अर्बन बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. अनेक मातब्बर रिंगणात उतरले आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
दाखल अर्जांची ३ नोव्हेंबर रोजी छानणी होणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करण्यात आले.