अहमदनगर : स्वरांनी भारावले, कार्यानी पाणावले 

0

युवानच्या कार्यक्रमाच्या वेळेआधीच सभागृह तुडुंब भरलेले असते हि जणू एक प्रथाच आहे.

युवान ह्या सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नगरकरांना रविवारी (दि.26) रोजी संध्याकाळी हे चित्र पाहावयास मिळाले.

सारेगमप लिटील चॅम्प अंजली व संगीत सम्राट नंदिनी गायकवाड यांचे टाळ्यांच्या कडकडात नगरकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक सत्कार, उदघाटन समारंभ यास फाटा देत युवान संस्थेतील दैनंदिन डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या आवाजातील सर्व धर्म प्रार्थनेने’ कार्यक्रमाचे उदघाटन झाले. त्यास यथायोग्य साथ देत अंजली व नंदिनीने रघुपति राघव’ हे गांधीजींचे आवडते भजन गात मैफिलीची सुरवात केली.

जय शारदे, ओम नमः शिवाय या भक्तिगीतांनी, दिवस तुझे हे फुलायचे, शूर आम्ही सरदार, दही तूप लोणी या मराठी तर पिया तो से नैना लागे रे, मेरे ढोलना सून, हसता हुआ नूरानी चेहरा या आणि अशा सदाबहार गीतांनी अंजली व नंदिनीने मैफिलीला वेगळाच साज चढवला. त्यांचे गुरु व वडील अंगद गायकवाड यांचे संगीत संयोजन लक्षवेधक होते.

26/11 च्या स्मृती दिनानिमित्त ए मेरे वतन के लोगो’ हे गीत गात अंजली व नंदिनीने शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर झालेला भारतमातेचा जयघोष प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा होता. युवानच्या सुरज भोसले व वर्षा गवारे या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून युवानचे कार्य उलगडून सांगितले.

यावेळी आशाताई फिरोदिया, प्रतिभा धूत, मोहन मानधना, डॉ. हेमंत नाईक, अॅड.श्याम असावा, डॉ. सुजाता नरवडे, सुहास रायकर, प्रसन्न पाठक, सुरेश मैड, हेमंत लोहगावकर यांच्या हस्ते अंजली, नंदिनी व गायकवाड दांपंत्याचा विशेष फोटो फ्रेम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*