अहमदनगर : आंदोलकांच्या गावात नेत्यांचा मळा

शेवगाव गोळीबार प्रकरण : पवार, विखे, हजारेंनी घेतली भेट

0

अहमदनगर : ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाल्याने तो विझविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आंदोलनादरम्यान जाळपोळही झाली. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलक शेतकर्‍यांच्या गावात राजकीय नेत्यांचा मळा भरला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांच्या गावाला भेटी दिल्या. अजित पवार भल्या सकाळीच नगरला पोहचले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी शेतकर्‍यांची भेट घेतली. त्यानंतर ते शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर येथे गेले. तेथे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऊस दरवाढीसाठी सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केले, हे चुकीचे आहे. सरकारची भूमिकाच शेतकरी विरोधी धोरणामुळे पोलिसांचे धाडस वाढले आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जखमी शेतकर्‍यांची खासगी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. नाव,गाव, वय विचारत त्यांना धीर दिला. विरोधीपक्षनेते विखे पाटील हेही दुपारनंतर जखमींच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहचले.

  • हिवाळी अधिवेशानात गोळीबाराचा जाब सरकारला विचारला जाईल. धीर धरा, मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर पवार यांनी शेतकर्‍यांना दिला. शेतकर्‍याची अस्थेने विचारपूस केल्यानंतर पवार यांनी भाजप सरकारवर टिका केली.  

LEAVE A REPLY

*