अहमदनगर : बदलीसाठी शिक्षकांचे आजपासून बेमुदत उपोषण 

साखळी उपोषणाला दुसऱ्या दिवशी अनेकांचा पाठींबा 

0
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी सर्व प्रक्रिया करूनही शासनाने आदेश दिले नाही नसल्याने बदली हवी असणारे शिक्षक  भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी मानवी हस्तक्षेप विरहित बदल्या होण्यासाठी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर 20 नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरु केले आहे आजचा दुसरा दिवस आहे.
आजच्या उपोषणात शिवाजी नवाळे , गजानन जाधव , सुनील नरसाळे , दिलीप जाधव , दादा चोभे , शरद म्हस्के ,विजय अंधारे हरिभाऊ जाधव , बाळासाहेब काशीद , शैलेश ढमाळ आदींसह अनेक शिक्षक बसले आहेत.
शिवाजी नवाळे अधिक माहिती देताना म्हणले आज महाराज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना यांनी पाठींबा दिला असून पांगोरी पिपंळगावचे सरपंच पण आमच्या बरोबर उपोषणाला बसले आहे, उद्या दि. 22 पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असून यावेळी बदली हवी असणारे सर्व शिक्षक, शिक्षिका उपोषणाला बसणार आहे

LEAVE A REPLY

*