अहमदनगर : स्वप्नील शिंदे भाजपच्या वाटेवर!

दानवेंची भेट; गांधींचा पुढाकार

0

अहमदनगर : सावेडीतील अपक्ष नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी भाजपची वाट निवडली आहे. खासदार दिलीप गांधी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा नारा देत शहरजिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी नगर शहरात भाजपची मोटबांधणी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश देऊन पक्ष मजबूत करण्यावर त्यांनी जोर दिला आहे. किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांनी आता सावेडी उपकेंद्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. सावेडीतील सेनेचे विद्यमान नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा गांधी गटाकडून केला जात आहे. हे नगरसेवक कोण? याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

विद्यमान नगरसेवक स्वप्नील शिंदे यांचे नाव आता ओपन झाले आहे. नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासोबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट घेतली. या भेटीत पक्ष प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुर्हूत कधी हे मात्र समजू शकले नाही. शिंदे हे अपक्ष म्हणून 2013 च्या सार्वजनिक निवडणुकीत विजयी झाले. तेव्हापासून आजतागायत ते राष्ट्रवादीसोबत आहेत. शिंदे यांचे मित्रकंपनी आमदार संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय आहे.

  • राष्ट्रवादीकडून कोंडीची व्यूहरचना
    स्वप्नील शिंदे भाजपात गेले तर त्यांच्या विरोधात स्ट्रॉग उमेदवार देऊन त्यांना पराभवाची धूळ चारायची अशी व्यूहरचना राष्ट्रवादीने अगोदरच आखली आहे. शिंदे यांच्या उमेदवार कोण याची चाचपणीदेखील झाली आहे. संबंधिताला तयारीला लागण्याची सूचनाही आमदार संग्राम जगताप यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून समजली. त्यामुळे शिंदे यांचा भाजपात प्रवेश होणार की जगताप यांच्याशी असलेले संबंध कायम राहणार याची उत्सुकता लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*