अहमदनगर : स्नेहालय आणि नाट्य परिषदेतर्फे आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे आयोजन

0

अहमदनगर : स्नेहालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 डिसेंबर रोजी आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगरमधील विविध चौकातून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पथनाट्याचे सादारीकरण होणार आहे, याच दिवशी सायंकाळी त्याचे पारितोषिक वितरणही केले जाणार आहे.

यंदाच्या वर्षी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील वर्षीपासून ही स्पर्धा राज्यस्तरीय स्वरुपात आयोजित करून दोन दिवसांचा ‘प्रबोधन जलसा’ या निमित्ताने अहमदनगरमध्ये आयोजिण्यात येण्यात असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे स्नेहालायच्या युवनिर्माण प्रकल्पाचे संयोजक विशाल आहिरे आणि नाट्य परिषदेचे नगर शाखेचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी दिली.

रस्त्यावर अथवा चौकात गर्दीच्या ठिकाणी विशिष्ट सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवर संवाद, गाणी, नृत्य, यांचा परिपोष असणारा, थेट लोकांशी संवादणारा नाट्याविष्कार म्हणजेच पथनाट्य.

 या पथनाट्यासाठी पुढील विषय देण्यात आले आहे. १. मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार २. समाजातील वाढता जातीयवाद आणि धर्मवाद ३. तरुणाईतील मोबाईलचे व्यसन.

पथनाट्याचे सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक गटाला 7 मिनिटे दिली जातील. प्रत्येक गटात किमान 5 कलाकारांचा सहभाग असणे आवश्यक. संहितेचे लेखक, दिग्दर्शक, सर्व कलाकार(असल्यास वादक, गायक) यांची यादी प्रवेशिकेसोबत देणे आवश्यक.

पारितोषिके-

प्रथम पारितोषिक- ५०००/- आणि फिरता करंडक

द्वितीय पारितोषिक – ३०००/-

तृतीय पारितोषिक- २०००/-

उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये १०००/- ची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहे.  

·        नियम व अटी

१.     प्रत्येक गटास सदरीकारानासाठी आयोजकांमार्फत ठरवून दिलेल्या चौकामाध्येच सादरीकरण करणे आवश्यक.

२.     दिलेल्या कालावधीमध्येच पथनाट्याचे सादरीकरण केले जाईल अन्यथा संघ बाद केला जाईल.

३.     परीक्षाकांद्वारे दिलेला निकाल हा अंतिम राहील.

४.     महाविद्यालाचे सामान्तीपत्र आणि ओळखपत्र सर्व सहभागी कलाकारांसाठी अनिवार्य राहील.

५.     सहभागी कलाकारांना लागणारा खर्च हा स्वतः करावा.

६.     विजेत्या प्रथम तीनही क्रमांकाच्या गटांना पुन्हा एकदा सादरीकरण करणे आवश्यक आहे.

७.     प्रत्येक सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

८.     आयोजकांकडून ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे उल्लंघन केल्यास संघ बाद केला जाईल.

९.     प्रवेश अर्ज देण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०१७.

१०.  करंडक हा फिरता राहील. तीन महिन्यानंतर पुन्हा स्नेहालय संस्थेमध्ये जमा करावा लागेल

प्रवेश अर्ज उपलब्ध : स्नेहालय युवनिर्माण या फेसबुक पेजवर जाऊन आपण लिंक डाऊनलोड करू शकतात. या शिवाय युवनिर्माण प्रकल्प, रेडीओ नगर ९०.४ एफ एम, बालिकाश्रम रोड, लेन्डकर मळा, अहमदनगर या ठिकाणी उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

*