नगर : पाणीपुरवठा विस्कळीत

0

अहमदनगर : नगरच्या पाणीयोजनेची वीज महावितरण कंपनीने तोडल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे शहरातील नियोजित भागात पाणी पुरवठा कमी दाबाने झाला, तर काही भागात उद्या पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महापालिकेकडे असलेल्या 153 कोटी थकबाकीपोटी महावितरण कंपनीने पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा बंद केला होता. काही वेळानंतर महापालिकेने थकीत बिलापोटी 57 लाखांचा धनादेश तातडीने अदा केल्यानंतर तब्बल चार तासाने पुन्हा वीज जोडण्यात आली.

त्यामुळे मुळानगर येथून होणारा पाणी उपासा पूर्ववत होण्यासाठी रात्रीचे साडे आठ वाजले. काल बुरूडगाव, सारसनगर भागाला पाणी पुरवठा होऊन शकला नाही.

त्यामुळे या भागाला आज पाणी पुरवठा करण्यात आला आहे. तसेच नियोजनानुसार आज स्टेशन रोड, आगरकर मळा, भागातील लोकांना उद्या पाणी पुरवठा होणार आहे. मात्र इतर परिसरात रोटेशनुसार नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले.

LEAVE A REPLY

*