अहमदनगर : छिंदम यांनी उपमहापौरपदाचा मान वाढविला

खा. दिलीप गांधी, ढोरजकर फाउंडेशनतर्फे बालभारत कला महोत्सव कार्यक्रम

0

अहमदनगर : महापालिकेमध्ये श्रीपाद छिंदम यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विविध विकास कामांना वेग आला आहे. सातत्याने शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम प्रयत्न करुन चांगले काम करत असल्यामुळे त्यांनी उपमहापौर पदाचा बहुमान वाढविला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमहापौर श्रीपाद छिंदम व गटनेते सुवेंद्र गांधी यांनी सातत्याने पाठपुरवठा करुन शहराच्या विकासाकरीता 10 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. छिंदम यांच्या कामाची दखल भारतीय जनता पार्टीनेही घेतली त्यामुळे नुकतेच त्यांना प्रदेश पातळीवरील दक्षिण भारत विभागाच्या संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. त्यामुळे त्यांचे काम गौरवस्पद आहे, असे प्रतिपादन शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी केले.
शहर भाजपाच्यावतीने उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपा दक्षिण भारत विभागाच्या प्रदेश संघटन सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल तसेच श्रीपाद छिंदम व माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. खा.दिलीप गांधी व गटनेते सुवेंद्र गांधी यांनी छिंदम बंधूंचा सत्कार केला. नगरसेवक स्वप्नील शिंदे, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा, महेश सब्बन, अभिजित चिप्पा, शहर उपाध्यक्ष प्रतिक बारसे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपमहापौर श्रीपाद छिंदम म्हणाले, खासदार दिलीप गांधी वेळोवेळी करत असलेल्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे चांगले काम करता येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शहराच्या विकासाकरीता 10 कोटींचा निधी मंजूर करता आला. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कायम सहकार्य करत असतात. प्रास्तविक प्रशांत मुथा यांनी केले तर आभार प्रतिक बारसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*