अहमदनगर : आमदार चषक फूटबॉल स्पर्धेत शिवाजीयन्स क्लब विजयी

सिटी क्लब स्पोर्टस् फाऊंडेशनचे आयोजन

0

अहमदनगर : सिटी क्लब स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजीयन्स क्लब संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत दणदणतीत विजय मिळविला. न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना शिवाजीयन्स क्लब विरुध्द फ्रेंन्डस क्लबमध्ये रंगला होता. यामध्ये शिवाजीयन्सने 3-0 गुणांनी फ्रेन्डस संघावर विजय संपादन करीत, आमदार चषकावर आपले नांव कोरले.
विजयी शिवाजीयन्स संघास 11 हजार रु. चषक व उपविजयी संघ फ्रेंन्डस क्लबला 7 हजार रु. स्मृतीचिन्हाचे बक्षिस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सारंग पंधाडे, उद्योजक सचिन ठोसर, पै.विजय पठारे, पै.गणेश घोरपडे, अभिजीत वाळके, मज्जू सय्यद, मुजाहिद शेख, स्पर्धेचे आयोजक तथा शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे, प्रशांत पगारे, तुकाराम गायकवाड, सोमा घोरपडे, अनिल निकल्सन, केनिथ कालसेकर, नाजीम सय्यद, उमर गुल, विकास गायकवाड आदि उपस्थित होते.
राहुल पाटोळे यांनी फुटबॉल खेळाला चालना देवून, शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी व्यासपिठ निर्माण करुन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रा.माणिक विधाते म्हणाले की, स्पर्धेच्या युगात युवक वर्ग तणाव व दडपणाखाली वावरत आहे. तणावदूर करण्यासाठी युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, तणावमुक्तीसाठी व्यायाम व मैदानी खेळ हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाबरोबर खेळालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फुटबॉलचा अंतिम सामना पहाण्यासाठी फुटबॉलप्रेमी व नागरिकांनी मैदानावर गर्दी केली होती. या फुटबॉल स्पर्धेत 16 संघांचा समावेश होता. ही स्पर्धा सेव्हन ए साईट या पध्दतीने खेळवली गेली. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट स्ट्राईकर- कमलेश ठाकुर, उत्कृष्ट गोलरक्षक- वेंदावे पाठक, उत्कृष्ट हाफ खेळाडू- आकाश गायकवाड, उत्कृष्ट अपकमिंग खेळाडू- आदेश सोनवणे यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जॉन सोनवणे व आकाश बोर्डे यांनी केले. आभार सचिन ठोसर यांनी मानले.

LEAVE A REPLY

*