अहमदनगर : याचिका न्याय प्रविष्ट : पाडापाडी थांबवा

मंदिर बचाव कृती समितीची मागणी

0

अहमदनगर :  उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शहरातील धार्मिक स्थळांवरील कारवा/ईची मोहीम थांबविण्यात यावी, अशी मागणी मंदिर बचाव कृती समितीने आज अतिरिक्त आयुक्त विलास वालगुढे यांच्याकडे केली आहे. सुहास मुळे व संजय वल्लाकट्टी यांनी हे निवेदन वालगुडे यांना दिले.

यावेळी कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, अभय गुंदेचा, नंदू भालेराव उपस्थित होते. महापालिकेने अनाधिकृत धार्मिक स्थळे पडण्याची मोहीम सुरू केली. त्यातील तांत्रिक त्रुटी विरोधात मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने संजय वल्लाकट्टी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिका सध्या उच्च न्यालयात प्रलंबित आहे. याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम महापालिकेने पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करून न्यायालायाचा मान राखावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांनी त्वरित अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याशी संपर्क केला. मनपाच्या वकिलांमार्फत या याचिके संदर्भात अभिप्राय मागून घ्यावा मगच कारवाई करावी अशी सूचना केली.

LEAVE A REPLY

*