अहमदनगर : शेवगाव नाट्य परिषदेचा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार संदीप दंडवते यांना जाहीर

0
अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेतर्फे दिला जाणारा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार या वर्षी अहमदनगर येथील प्रसिद्ध नाट्य-चित्रपट लेखक व दिग्दर्शक संदीप पोपटराव दंडवते यांना जाहीर झाला असून येत्या गुरुवारी, 30 नोव्हेंबर रोजी शेवगाव येथे पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले , रीमा अमरापूरकर व  शेवगावचे जेष्ठ रंगकर्मी रमेश भारदे , राजीव रसाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर, उपाध्यक्ष भगवान राउत व कार्यवाह माफीज इनामदार, सहकार्वाह भाऊ  काळे , फिरोज काझी व भाऊसाहेब शिंदे यांनी दिली.
संदीप दंडवते लिखित माईक या एकांकिकेने तब्बल 35 वर्षांनतर महाराष्ट्राचा मानाचा पुरुषोत्तम करंडक नगरला मिळून दिला असून त्यांचे लेखन दिग्दर्शन असलेला ‘भ्वा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
खडतर परिस्थिती व कुठलाही कलेचा वारसा नसताना  कलाक्षेत्रात ते करत असलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे .
अकरा हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पहिला पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते व कवी किशोर कदम -सौमित्र यांना प्रदान करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*