अहमदनगर : 10 डिसेंबरला स्व.सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सोहळा

0
अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा दुसरा स्व.सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना नुकताच जाहीर करण्यात आला होता.
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या शुभहस्ते वाडकरांना सन्मानित करण्यात येणार आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
रविवार दि. 10 डिसेंबर रोजी माऊली सभागृह येथे सायंकाळी 6.30 वा. हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रु.51 हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकप्रिय गायक म्हणून हिंदी-मराठी चित्रपट, भक्ती, भाव संगीतात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल वाडकरांना थिंक ग्लोबलच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे.
वाडकरांचे गुरुकुल असणार्‍या आजिवासन संगीत निकेतनच्या विश्वस्त प्रेम वसंत यांच्यासह राजाभाऊ अमरापूरकर, उमेश पाटील, नाट्य परिषदेचे प्र.अध्यक्ष अ‍ॅड. दीपक शर्मा, चित्रपट निर्माते अनिल जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध गायक पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वराभिषेक या भक्तीगीते व नाट्यगीतांच्या मैफिलीची मेजवानी नगरकर रसिकांना मिळणार आहे.
झी टीव्ही सारेगमपाची विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड या देखील यावेळी गाणी सादर करणार आहेत. चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे हे सुरेश वाडकर यांचे यावेळी लाईव्ह स्केच रेखाटणार आहेत. सोहळ्याचा आणि मैफिलीचा आनंद नगरकरांना लुटता यावा यासाठी फौंडेशनने पुढील केंद्रांवर विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*