अहमदनगर : धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करा

मुस्लिम शिष्ट मंडळाची प्र. आयुक्तांकडे मागणी

0

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने शहरात धार्मिक स्थळाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ते पूर्णपणे चुकीच्या निकषानुसार करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई सुरू आहे. सदर करवाई थांबवावी, व सर्व धार्मिक स्थळाचे पुराव्यासह फेरसर्व्हेशन करावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने प्र. आयुक्त भानुदास पालवे यांच्याकडे निवेदना देऊन करण्यात आली.
या वेळी उबेद शेख, हाजी करीम हुंडेकरी, हाजी इरफान, हाजी फिरोज, हजी अन्वर खान, मुन्ना चमडेवाला, हनिफ जरीवाला, मुख्यातर अहमद कुरेशी, अ‍ॅड.सलीम रंगरेड आदी उपस्थितीत होते.
शहरात दुसर्या टप्पयातील 68 अनाधिकृत धार्मिक स्थळे असून त्यात 1960 व 2009 नंतरची धार्मिक स्थळांचा समावेश करून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दोषानुसार कारवाई करून सुमारे 17 धार्मिक स्थळे पाडण्यात आली. त्यांची प्रतिक्रिया उमटून शहरात रस्तारोको मोर्चे, भजन, सभा आदींसह विविध आंदोलन करण्यात आली. दि.17 नोव्हेंबर पर्यंत कारवाई करण्याचें न्यायालयाचे निर्देश होते. मात्र महापालिकेच्या वतीने चुकीच्या आधारे सर्वेक्षण केले आहे. विविध धार्मिक स्थळाचे कागदपत्रे उबेद शेख यांनी पालवे यांना दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या कागदपत्राच आपण विचार करावा.असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*