अहमदनगर : भाईंचा दौरा लांबला!

0

अहमदनगर :  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी जिल्हा दौर्‍यावर येणारे संपर्कमंत्री रामदासभाई कदम यांचा दौरा लांबणीवर पडणार आहे. पूर्वी 17 नोव्हेंबरला होणारा दौरा आता 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवस भाई नगरला मुक्काम ठोकून सेनेत ‘जान’ भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी स्थानिक शिवसेना नेतृत्वाने केली आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे नाव भावी उमेदवार म्हणून पुढे आले आहे. लोकसभा मतदारसंघ तसेच नगर शहर व दक्षिणेतील विधानसभा मतदारसंघातील सेनेच्या उमेदवारांची (भावी आमदारांची) चाचपणी करण्याकरीता भाई नगरला येत आहेत.
सेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील बैठकीनंतर भाईंचा चाचपणी दौरा ठरला आहे. त्यामुळे भाईंच्या दौर्‍याला महत्वप्राप्त झाले आहे. भाई 17 नोव्हेंबरला नगर दौर्‍यावर येणार होते. मात्र या दिवशी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. मुंबईत शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास रामदासभाई उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच नगरला 17 नोव्हेंबरला दौरा पुढे ढकलल्याची सूत्रांकडून समजले. आता 5 डिसेंबरला हा दौरा होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

  • महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्या माध्यमातून शहरावरील ढिली झालेली शिवसेनेची पकड पुन्हा एकदा मजबूत होऊ शकते. अनिलभैय्या राठोड सोडले तर त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. हे वास्तव असल्याचे शिवसैनिकही मान्य करतात. रामदासभाई नगरला आल्यानंतर ते शिवसैनिकांना चार्ज करणार आहेत. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अनिल राठोड भाईंच्या दौर्‍याची जय्यत तयारी करत आहेत. अनेकांचा शिवसेना प्रवेश या दौर्‍यात होईल याचे नियोजन सुरू आहे.
  • भगवानरावांची तयारी?
    भगवान फुलसौंदर लोकसभेची उमेदवारी करण्यास फारसे उत्सुकत नाहीत. मात्र घोगरगावातील सरपंचांचा सत्कार सोहळा तोही सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करून भगवानरावांनी तयारी सुरू केल्याचे संकेतच जणू काही दिले.

LEAVE A REPLY

*