अहमदनगर : ‘मर्डरवाले कुलकर्णी’ने केला वादाचा एन्काउंटर

नगर केंद्रावर पहिला क्रमांक

0

अहमदनगर :– हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सर्व वादांचा एन्काउंटर करीत मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाने अहमदनगर केंद्रावर प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या स्पर्धेचा निकाल काल रात्री उशिरा जाहीर केला. देऊळगाव सिद्धीचे लास्ट स्टॉप दुसरे तर द स्लाईस ऑफ लाईफ हे नाटक तिसरे आले. दिग्दर्शनासाठी अमित खताळने पहिले पारितोषिक पटकावले. काशिनाथ सुलाखे पाटील यांनी दुसरा क्रमांक मिळवला. मर्डरवाले कुलकर्णीची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

57वी राज्य नाट्य स्पर्धा गेल्या आठड्यात पार पडली. या स्पर्धेचा काल (बुधवारी) रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. प्रकाशयोजनेसाठी प्रसाद बेडेकर (मर्डरवाले कुलकर्णी), द्वितीय – शेखर वाघ (आकाशपक्षी), नेपथ्य – नाना मोरे (एक्झिट), द्वितीय – हेमंत कुलकर्णी (अखेरची रात्र), रंगभूषा – प्रथम – प्रिया खताळ ( मर्डरवाले कुलकर्णी), द्वितीय -अवंती गोळे (लास्ट स्टॉप). उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक – सुफी सय्यद (लढा), शोभा चांदणे-नांगरे (लास्ट स्टॉप).
अभिनय प्रमाणपत्र – शीतल परदेशी (आकाशपक्षी), मनिषा सीता (लढा), हर्षदा भावसार (अतृप्त), अश्‍विनी अंचवले (चाहूल), विनोद वाघमारे (याचक), अमित रेखी (द स्लाईस ऑफ द लाईफ), श्रेणिक शिंगवी (आकाशपक्षी), प्रवीण कुलकर्णी (मर्डरवाले कुलकर्णी).
परीक्षक म्हणून चेतना वैद्य, गुरू वठारे, डॉ. शशिकांत चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दि. 7 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा नगर केंद्रावर पार पडली. ज्या केंद्रावर 15 िंकंवा त्यापेक्षा जास्त नाटके सादर झाली असतील तेथून 2 नाटके अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली. मात्र, नगर केंद्रावर 15 नाटकांची एंट्री झाली होती. परंतु तांत्रिक कारणाने त्यातील एक नाटक रद्द झाले. त्यामुळे एकाच नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली. स्पर्धा सुरू असताना कार्य संचालनालनालयाने हा निर्णय घेतल्याने नगरच्या नाट्यकर्मींनी नाराजी व्यक्त केली.

  • पडदा पडला
    निकालाने सर्व प्रश्‍नांवर पडदा पडला आहे. या नाटकाला पहिला क्रमांक मिळू शकतो. याची कुणकुण लागल्यानेच वाद निर्माण करण्यात आला असावा. मात्र, स्पर्धेचा निकाल सर्व काही सांगून गेला. आता अंतिम फेरीसाठी सज्ज व्हावे लागेल…..अमित खताळ, दिग्दर्शक, मर्डरवाले कुलकर्णी.
  • कुलकर्णी निघाले मर्डर करायला
    गेल्या वर्षी वादामुळे एकही नाटक अंतिम फेरीसाठी निवडले गेले नव्हते. यंदा मर्डरवाले कुलकर्णी या पहिल्या क्रमांकाच्या नाटकाबाबतही वाद उदभवला होता. नागपूरचे लेखक जयंत उपाध्ये यांनी हे नाटक आपल्या नाटकाच्या नावावरून घेतले आहे, असा आक्षेप सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे घेतला होता. संचालनालयाने संहितेची शहानिशा करून निकाल दिला. परीक्षकांनी आपले याच नाटकाच्या पारड्यात टाकले. त्यामुळे हे नाटक अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहे. नगर केंद्र जिंकल्यानंतर हे मर्डरवाले कुलकर्णी अंतिम फेरीत मर्डर करायला निघतील.

LEAVE A REPLY

*