अहमदनगर : पोदार स्कूलमध्ये क्रीडा सोहळा उत्साहात

0

अहमदनगर : पोदार इंटरनॅशनल स्कूल पहिला वार्षिक क्रीडा दिवस सोहळा शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला. या कार्यक्रमाची सुरूवात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली वलाकट्टी (देवकर) यांच्या हस्ते तसेच उपमहापौर सुवर्णा कोतकर, पोदार एज्युकेशन नेटवर्कचे ट्रान्सपोर्ट डायरेक्टर सी एस मनी, नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे, उद्योजक सावन छाब्रा यांनी फुगे हवेत सोडून केले.

संमेलनात खेळामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण, चांदी व कांस्य पदक तसेच विविध सांघिक खेळासाठी चषक देऊन सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरणाचा सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. सौ. अंजली वलाकट्टी (देवकर) यांनी आपल्या भाषणात खेळाचे महत्व सगळ्याना पटवून दिले. त्यांनी मुलांना पोदार शाळेद्वारे 21 व्या शतकात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी देण्यात येणार्या गुणवत्तापूर्व शिक्षणाबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थी परिषदेतील सर्व नेतृत्व करणार्या विद्यार्थ्यानी मशाल फिरवून खेळाचे वातावरण तयार केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यानी खेळीमेळिने स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी व नियमांचा आदर करण्याची शपथ घेण्यात आली. शाळेचा ध्वज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फडकविण्यात आला. शाळेच्या वेंटस, आक्वा, इग्निस व टेरा गटातील विद्यार्थ्यानी संचालन केले. इयत्ता नर्सरी ते 5 वी मधील विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रात्यक्षिके व नृत्याद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. पूर्व प्राथमिक विभाग पोदार जम्बो किड्स मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खो खो, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, अडथळा शर्यत अशा खेळांचे प्रात्यक्षिक केले.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यानी कवायत, योगा, रिंग नृत्य व प्रात्यक्षिकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. पालकांसाठीही विविध स्पर्धेचे आयोजन केले होते, यामध्ये रस्सीखेच स्पर्धा सर्वांचे आकर्षण ठरली. अहमदनगरमधील सर्व पालक वर्गाने शाळेचे पहिलेच क्रीडा संमेलन असताना एवढ्या यशस्वी रीतीने सादर केल्याबद्दल शाळेच्या प्रशासनाचे अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये शाळेचे प्राचार्य श्री मंगेश जगताप, क्रीडा शिक्षिका सौ. शीतल यादव, प्रशासन अधिकारी श्री. आशुतोष नामदेव, श्री. गिरीश ठमके , श्री. सुभाष गोळे, श्री. नरेंद्र चौधरी आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचा पालकवर्ग यानी योगदान दिले. सूत्रसंचालन इयत्ता दुसरीच्या अंजली जगताप व इयत्ता पाचवीच्या तन्मय गुन्देचा समवेत समुपदेशक नताशा अमर व तृप्ती सोनवणे यांनी तर मंगेश जगताप यानी आभार मानले.

LEAVE A REPLY

*