लोणीमावळा रेप, मर्डर केस : सजा-ए-मौत

पीडीतेच्या कुटुंबाला 1 लाख

0
अहमदनगर : अल्पवयीन शालेय मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून केल्याप्रकरणी कोर्टाने तिघा नराधाम आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. तिघांनाही प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून त्यातील एक लाख रुपये पिडितेच्या कुटुंबियांना देण्यात येणार असून उर्वरित रक्कम सरकार जमा केली जाणार आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आज (शुक्रवारी) सकाळी हा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच तिघांना प्रत्यक्षात फाशी दिली जाणार आहे.

संतोष विष्णु लोणकर (वय 35), मंगेश दत्ता लोणकर (वय 30) व दत्तात्रय शंकर शिंदे (वय 27) (तिघे रा. लोणी मावळा, ता. पारनेर) अशी फाशी सुनावलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील पिडित मुलीवर रेप करून तिचा खून करण्यात आला होता. 22 ऑगस्ट 2014 रोजी घडलेल्या या घटनेची सुनावणी न्यायालयासमोर झाल्यानंतर 6 नोव्हेंबरला तिघाही आरोपींना दोषी धरण्यात आले. आज (दि.10) न्यायाधीश केवले यांनी तिघांना शिक्षा सुनावली. कटकारस्थान रचने, सामुहिकपणे अत्याचार करणे या कलमाखाली तिघांनाही जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला दंड न भरल्यास 1 वर्षे सक्त मजुरी तसेच खून व रेप या कलमान्वये तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. पिडितेच्या कुटुंबियांना एक लाख रुपये दिले जाणार असून उर्वरित रक्कम सरकार जमा होणार आहे. मोटारसायकल तसेच अन्य वस्तूंचा लिलाव करून ती रक्कमही सरकार जमा केली जाणार आहे. आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी दिली गेली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रत्यक्ष फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आळकुटी येथील शाळेत शिक्षण घेणारी पिडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. आरोपींना तिला अडविले. तिचे तोंड दाबून तिच्यावर पुलाखाली रेप केला. रेप करतेवेळी तिच्या नाकातोंडात चिखल कोंबला. तो थेट स्वरयंत्रणेपर्यंत गेला. त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला होता. विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर तपासलेले 32 साक्षीदार, 24 पुरावे पाहता तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

घटनाक्रम :

 • 22 ऑगस्ट 2014
  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अत्याचारानंतर तिचा खून
  23 ऑगस्ट रोजी संतोष लोणकरला अटक
  25 ऑगस्ट रोजी मंगेश लोणकर, दत्तात्रय शिंदेला अटक
  18 नोव्हेंबर 2014 ला कोर्टात दोषारोपपत्र दाखल
  अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती
  1 जलै 2015 पासून कोर्टात हेअरिंग सुरू
  7 जुलै 2017 खटल्याची सुनावणी पूर्ण
  6 नोव्हेंबरला तिघांनाही दोषी धरलं गेलं.
  10 नोव्हेंबर तिघांनाही फाशीची शिक्षा

 

 • क्रमवारीत उभं करत सुनावली शिक्षा
  सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास न्यायाधीश केवले डायसवर आल्या. आरोपींना क्रमवार उभे करण्यात आले. या पूर्वीच दोषी धरल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर आज शिक्षा सुनावत असल्याचे सांगत तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.
 • मराठीत निकाल वाचन
  न्यायाधीश केवले यांनी आरोपींना समोर बोलविण्यापासून ते निकाल देईपर्यंतचे कामकाज शुध्द मराठी भाषेतूनच केले. निकाल ऐकण्यासाठी कोर्ट हॉल पूर्णपणे भरलेला होता. आरोपींभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
 • कोर्टाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. फाशीच्या शिक्षेमुळे समाजात जे लोक असे कृत्य करतात, त्यांच्यावर आळा बसेल. अ‍ॅड. निकम यांनी कोणतेही परिस्थितीजन्य सक्षम पुरावे नसताना योग्य युक्तीवाद केल्याने न्यायालयाने लोणी मावळ प्रकरणातील आरोपीना फाशी दिली. अ‍ॅड.निकम यांचे अभिनंदन – अ‍ॅड. संदीप भोगाडे
 • न्यायलयाने या प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्याने पिडितेस न्याय मिळाला असे मला वाटते. मात्र अशी कृत्य जे करतात त्यांना जनतेसमोर शिक्षा दिल्यास कोणताही व्यक्ती असे कृत्य परत करणार नाही. आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे.न्यायलयाने या प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्याने पिडितेस न्याय मिळाला असे मला वाटते. मात्र अशी कृत्य जे करतात त्यांना जनतेसमोर शिक्षा दिल्यास कोणताही व्यक्ती असे कृत्य परत करणार नाही. आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे.    – अ‍ॅड. रूपाली पठारे 
 • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात अत्याचार करणार्‍या नराधमांना चौरंग करण्याची शिक्षा होती. असे क्रुरकर्म करणार्‍या लोकांमध्ये भिती निर्माण होऊन त्याला आळा बसेल. आरोपींना शिक्षा देण्यास थोडा उशीरा झाला असला तरी ही न्यायलयाने फाशीची शिक्षा दिल्याचे समाधान आहे. कोपर्डी प्रकारणातील आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा मला आहे.  – अ‍ॅड. अनुराधा येवले
 • लोणी मावळ खटल्याची सुनावणी गत दीड वर्षापासून न्यायलयात सुरू होती. आज कोर्टाने तिघा आरोपींना फाशी ठोठावली आहे. या शिक्षेमुळे सामान्य लोकांचा कायद्यावरचा विश्वास दृढ होईल. तसेच समाजात कायद्याचा धाक देखील वाढेल. या निकालामुळे सत्याचा विजय झाला असे वाटते.- अ‍ॅड.कल्पना शिंदे
 • एका पारड्यात दु:ख, दुसर्‍यात न्यायएका पारड्यात दु:ख, दुसर्‍यात न्यायमाझी एकुलती एक मुलगी होती. तिच्यावर झालेल्या अत्याचाराने आम्ही खचून गेलो होतो. मात्र तिला न्याय देण्यासाठी अ‍ॅड, निकम, पोलीस, नागरिक व माध्यमे उभी राहिली. त्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. कोर्टाच्या निकालाने समाधान वाटते आहे. पण एका पारड्यात न्याय तर दुसर्‍या पारड्यात मुलगी गेल्याची दु:ख आहे. हा न्याय माझ्या एकट्या मुलीचा नसून देशातील सर्व मुलींचा आहे . — पीडितेची आई
 • कोपर्डीचा निकाल 18 ला
  बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सुनावणीही पूर्ण झाली आहे. 18 नोव्हेंबरला या खटल्यातील आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. लोणी मावळाचा निकाल देणार्‍या जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोरच कोपर्डीची सुनावणी पूर्ण झाली आहे.

LEAVE A REPLY

*