अहमदनगर : ढगांची दाटी अन् सोसाट्याचा वारा!

नगरकरांना अनुभूती मुंबई, नाशिक, माळशेजला पाऊस

0

अहमदनगर : ओखी चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून नगरचे वातावरण अचानक बदलले आहे. सूर्यदर्शनही नगरकरांना दुर्लभ झाले आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा वाहत असल्याने नगरकरांना हिवाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती येत आहे.

मंगळवारी सकाळपासून मुंबई, नाशिक, माळशेज घाटात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशार्‍यामुळे आज (मंगळवारी) मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दक्षिण भारताला झोडपणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे.

  • नगरमध्ये तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. सकाळचे उन्हं दुरापास्त झाले आहे. सकाळीच सोसाट्याचा गार वारा सुटत आहे. सूर्यदर्शनही नगरकरांना होत नाही. दिवसभर वातावरण ढगाळ असते.

LEAVE A REPLY

*