अहमदनगर : ‘सरदारा’साठी भाईंचा डेरा; शिवसेनेचे मिशन

0

 लोकसभा, विधानसभेसाठी चाचपणी

अहमदनगर : भाजपशी उडत असलेले खटके पाहता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीची शक्यता धूसर होऊ पाहत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सेनेने ‘सरदार’ शोधण्याची मोहीम हाती घेतली. सेनेचे मंत्री रामदास (भाई) कदम हे नगर जिल्ह्यात तीन दिवस ‘डेरा’ टाकणार आहेत. यात ते ‘सरदाराची’ चाचपणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गत आठवड्यात शिवसेनेप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांनी बैठक घेतली. त्यात ‘तयारीला लागा’ असा आदेश दिला आहे. त्यानंतर जिल्हा शिवसेनेची बैठक संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नगर येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. रामदास भाई कदम हे तीन दिवस जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याची तयारी या बैठकीत करण्यात आली.
भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्याशी सेना नेत्यांचे सूत जुळत नाही. तोच धागा पकडून माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे नाव सेनेने लोकसभसभेसाठी पुढे केले आहे. फुलसौंदर यांच्याशिवाय कोण आहेत का? याची चाचपणी कदम करणार आहेत.
कदम हे दक्षिणेतील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत,जामखेड, पाथर्डी, राहुरी आणि नगर तालुक्यातील पदाधिकार्‍यांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. त्यांची मते अजमावून घेणार आहेत. याच दौर्‍यात ते विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीदेखील करणार आहेत. एका दिवसात दोन तालुक्यात ते बैठक  घेणार असून नगर शहरात दौर्‍याचा समारोप करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेना प्रवेश सोहळा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अहमदनगर महापालिकेत सत्ता आल्यानंतर सेनेत ‘जान’ आली आहे. अनिल भैय्याही अंग झटकून कामाला लागले आहेत. सेनेच्या नगरसेवकांशिवाय इतरांच्या गाठीभेटीवर त्यांनी भर दिला आहे. ओपन काही न करता विरोधकांना गाफील ठेवत त्यांनी ‘भिंतीआड’ बैठका, भेटी सुरू केल्या आहेत. भैय्यांची क्रेझ अजूनही शहरात टिकून आहे. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात ते पूर्ण तयारीनिशीच उतरणार आहेत. विरोधकाला चितपट करून ते विधानसभेचा आखाडा मारतील अशीच व्यूहनिती सेनेकडून आखल जात आहे.

भैय्यांची गोळाबेरीज : सेनेचे उपनेते अनिल राठोड हे गत 25 वर्षे शहराचे आमदार होते. त्यांचेच नाव पुन्हा नगर विधानसभेसाठी चर्चेत आहे. त्याची तयारी त्यांनी केव्हाच सुरू केली आहे. त्यामुळे दुसर्‍या फळीतील नेत्यांनी लोकसभेचा विचार करणे सुरू केले आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक जिंकणारच असा चंग मनाशी बांधत अनिलभैय्यांनी ‘बेरजेचे’ राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचा खासदार दिलीप गांधी विरोधक गट हाताशी धरला आहे.

आयात’ उमेदवाराचाही विचार :  शिवसेना नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढविणार असून दुसर्‍या पक्षातून कोणी पॉवरफुल्ल नेता शिवसेनेत आला तर त्याचे स्वागत करून प्रसंगी त्यालाही उमेदवारी दिली जाईल, त्याची तयारीही स्थानिक नेतृत्वाने ठेवली आहे

LEAVE A REPLY

*