अहमदनगर : यश शहाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

पेमराज सारडा कॉलेजने मिळवले शालेय १९ वर्ष वयोगटात बॅडमिंटनमध्ये राज्याचे सांघिक उपविजेतेपद

0

सातारा येथे नऊ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर पर्यंत संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील शालेय गटातील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अहमदनगरच्या पेमराज सारडा कॉलेजने राज्याचे उपविजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेमध्ये नाशिक ,अमरावती,, पुणे ,मुंबई ,कोल्हापूर ,लातूर औरंगाबाद ,नागपूर येथील निवडक खेळाडूंचा सहभाग होता. पेमराज सारडा कॉलेजचे खेळाडू यश शाह, प्रणव पल्लोड ,व,पृथी ढापसे या खेळाडूंचा यात सहभाग होता राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचनालयपुणे व सातारा येथील झीला क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषदेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

नाशिक व.अमरावती संघांचा सरळ पराभव करून अंतिम सामना मुंबई संघाबरोबर अटीतटीचा झाला २-१ ने हा सामना मुंबई ने जिंकला पेमराज सारडा कॉलेज ला राज्याचा उपविजेये पदाचा एक करंडक व. खेळाडूंना रजत पदक देवन या प्रसंगी गौरविण्यात आले.

त्यानंतर सातारा येथेच निवडक खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेत याच कोळगेचा खेळाडू यश अनिल शाह याची 19 वर्ष वयोगटात राष्टीय संघामध्ये निवड झाली आहे या यशाबद्धल कॉलेजचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, अध्यक्ष शिरीष मोडकं, साचव सुनील रामदासी, प्राचार्य अमरजा रेखी असेरी सर ,प्रशिक्षक संजय धोपावकर , संजय साठे ,नगरमधील बॅडमिंटन प्रेमी, असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया सचिव मिलिंद कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

यशची दुसऱ्यांदा शालेय राष्टीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे या अगोदर १४ वर्ष वयोगटात त्यांची राष्टीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

LEAVE A REPLY

*