अहमदनगर : लग्नाचे दिवस 52

0

अहमदनगर : दिवाळीत तुलसीविवाहानंतर लग्न मुहूर्त काढण्याची आजही परंपरा कायम आहे. तुलसी विवाह पार पडलेत. त्यामुळे इच्छुक वधू-वरांना लग्न मुहूर्ताची घाई असते. मात्र, यंदा फक्त 52 विवाह मुहूर्त आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विवाह तारखांत घट झाली आहे.

यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने इच्छुक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे.
कारण मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉल बुक करणे अवघड होत आहे.

या वर्षात केवळ 52 विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 10, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये 9 मुहूर्त असून जूनमध्ये केवळ 4 मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही.

विवाह मुहूर्त पौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास 16 मे ते 13 जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे अनेकांना विवाहासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे.

 कोणत्या महिन्यात किती मुहूर्त :

डिसेंबर – 2, 13, 17, 18, 22, 26, 28,29, 30, 31  फेब्रुवारी – 5, 9, 11, 18, 19, 20, 21, 24  मार्च – 3, 4, 5, 6, 12, 13, 14  एप्रिल – 19, 20, 24, 25, 26, 27, 28, 30  मे – 1, 2, 4, 6, 7, 8, 9, 11, 12  जून – 18, 23, 28, 29  जुलै – 2, 5, 6, 7, 10, 15

LEAVE A REPLY

*