अहमदनगर : देशात असहिष्णुतेचे वातावरण; रंगनाथ पठारेंचे निरीक्षण

0

नगरात साहित्यिकांचा मेळा

अशोक निंबाळकर @ अहमदनगर : औद्योगिक घराणे देशाच्या प्रसारमाध्यमे, सांस्कृतिक संघटनांवर ताबा मिळवित असतील तर ते धोकादायक आहे. काही भयसूचक संकेत मिळत असून आपण तयार राहायला हवे. गप्प राहिलो तर काळ माफ करणार नाही. येणार्‍या पिढीचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करत देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे निरीक्षण संमेलानाध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी नोंदविले. पठारे यांच्या निरीक्षणाच्या वक्तव्याने असहिष्णुतेच्या वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे.

अहमदनगर शहरात आज सकाळी 11.30 च्या सुमारास विभागीय मराठी साहित्य संमेलनाचचे उद्घाटन प्रसिध्द वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत गडाख, आशाताई फिरोदिया, मसापाचे कार्यवाह मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, पायगुडे, स्वागतध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,महापौर सुरेखा कदम उपस्थितीत होते.
संमेलनाध्यक्ष पठारे म्हणाले साहित्य संस्था बदलत आहेत. साहित्याचा भुगोल बदलतो आहे. साहित्याप्रमाणे साहित्य संस्थांनी बदलले पाहिजे. अभिजात भाषेबद्दलचा अहवाल दिला आहे. आता त्याबाबत पुढे सरकारने कार्यवाही करावी. या देशात काही औद्योगिक घराणे देशाच्या सांस्कृतिक, विविधतेवर ताबा मिळवित आहेत. एकच आवाज उमटतो आहे. विरुद्ध आवाज निघाला तर गळा दाबण्याचे काम होत आहे, हे भयसूचक आहे.

अशा गोष्टींखाली साहित्यिक दबुन गेलो, तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. मोदी यांना लोकशाही व्यवस्थेने पंतप्रधान केले आहे, पण चुकीचे केले तर त्याला विरोध केला पाहिजे. वेगवेगळ्या भूमिका लोकशाहीत व्यक्त झाल्या पाहिजेत.
उद्घाटनानंतर फुटाणे म्हणाले रंगनाथ पटारे अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष होण्यासारखे आहेत. नगरला मळीचा वास आहे. पण पठारे तळमळीचा कार्यकर्ता आहे. फिरोदियांसारखे व्यक्तिमत्त्व नगरची शान आहेत. मला आचार्य अत्रेंच्या मी कसा झालो या पुस्तकाने घडलो. यशवंतराव गडाख यांनी भव्य दिव्य संमेलन केले. या संमेलनाची गरज आहे. वाचनसंस्कृती नसल्याने माणसांत पशुत्व वाढत चालले आहे. राज्यकर्ते मतांपुरते बघतात. मतांवर तुमची लायकी ठरते. माणसाकडे मतदार म्हणून पाहतात. साहित्यिकांनी माणूस पाहावा. छानछौकी कादंबरीतून साहित्यिकांनी बाहेर पडावे. तरच समाजाची प्रगती होईल. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला तरी चालेल. कसदार साहित्य तयार झाले तरच भाषा टिकेल. सत्यजित रे यांना बंगालमध्ये जाऊन कसदारपणामुळे साहित्य टिकेल. देशात चाललेल्या त्याच्या विरोधात उभे ठाकण्याची वेळ आली आहे.
मिलिंद जोशी म्हणाले रामदास फुटाणे यांनी साहित्याला गती दिली. हाडाचा कार्यकर्ता जयंत येलूलकर यांच्यामुळे हे संमेलन होत आहे. मसापची स्थापना संमेलनातून झाली. ग्रंथकार संमेलन बंद पडत होती. त्या वेळी मसाप स्थापन झाली. मिलिंद जोशी, रंगनाथ पठारे यांच्यासारखी माणसं अखिल भारतीयच्या निवडणुका लढवित नाहीत. यासाठी घटनेत बदल करण्याचे काम सुरू आहे. साहित्य संमेलन मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर आंतरिक विकास होण्याचे काम संमलने करतात.
संमेलनात गणेश भगत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी भूषण देशमुख, सुमती लांडे, संग्राहक शब्बीरभाई शेख, सु. प्र. कुलकर्णी, लीला गोविलकर, मसापचे मुख्य शाखाध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगरला कला, क्रिडा, साहित्यांचा मोठा वारसा आहे. या साहित्य समेलनाच्या माध्यमातून साहित्य चळवळ पुढे नेली जात आहे. सावेडी शाखेच्या माध्यमातून नगरला अखिल भारतीय साहित्य संमेलन घेणार असल्याची माहिती विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी आज येथे दिली. फिरोदिया म्हणाले, आम्ही मूळचे राजस्थानी 250 पूर्वी नगरमध्ये आलो. त्यानंतर आम्ही इथले भूमिपुत्र झाले आहे. त्यामुळे नगरकरांच्या लोकांना विविध क्षेत्रात स्थान मिळालेले पाहिजे, नवनवीन तंत्र ज्ञानाचा उपयोग साहित्यिकांसाठी केला जावा. साहित्य रूजले तरच सीटी स्मार्ट होऊ शकते. साहित्य रुजण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतले जाईल असे त्यांनी सांगितले.

 संमेलनात मुलांनाही सहभागी करून घ्यावे. या साहित्य मेजवाणीचा लाभ घ्यावा. या संमेलनामुळे नगरच्या वारशात भर पडेल. संमेलनात मुलांनाही सहभागी करून घ्यावे. या साहित्य मेजवाणीचा लाभ घ्यावा. या संमेलनामुळे नगरच्या वारशात भर पडेल.  …सुरेखा कदम, महापौर 

आंतर्बाह्य रूप पालटले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारला 2 लाख पत्र पाठविली. 27 फेब्रुवारीपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा कोणताही अडथळा राहिला नाही. …. विवेक कुलकर्णी 

LEAVE A REPLY

*